येरमाळा : फिर्यादी नामे- अनिरुध्द नागनाथ पंडीत, वय 42 वर्षे, रा. बाभळगाव ता. कळंब जि. धाराशिव यांनी अंदाजे 19,35,238 ₹ किंमतीचे 22 कॅरेटचे 342 ग्रॅम 520 मिली वजनाचे सोने हे डायी, बॉल, चेक्स, पट्टे, जाळी, सोन्याची तार बणवण्यासाठी दिलेले असताना नमुद आरोपी नामे-राजु रंगनाथ सामंत, वय 34 वर्षे, रा. ग्राम पोतापूर ता. घाटाल जि. पश्चिम मंदीरपुर राज्य पश्चिम बंगाल यांनी दि.24.11.2023 ते दि. 26.11.2023 रोजी 08.24 वा. सु. दहिफळ येथील श्री ज्वेलर्स दुकानाचे बाजूच गाळ्यामधून अनिरुध्द पंडीत यांना न विचारता घेवून जावून फसवणूक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अनिरुध्द पंडीत यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 420, 406 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मालमत्तेविरुध्द गुन्हे
मुरुम : फिर्यादी नामे- विकास भैरु गायकवाड, वय 48 वर्षे, रा. आरोग्य नगर उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांचे समृध्दी इंग्लिश मेडियम स्कुलच्या खोलीचे कडी कोंडा अज्ञात व्यक्तीने दि. 27.10.2023 रोजी 06.00 ते दि. 28.11.2023 रोजी 09.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन एक कॅनॉन कंपनीचे प्रिंटर, एक कॉम्प्युटर मॉनिटर, एक ॲम्पलीफायर, एक माईक, थ्री फेज इलेक्ट्रीक वायर,टु फेज इलेक्ट्रीक वायर 250 फुट, एक ब्ल्लुटुथ साउंड असा एकुण 20,300 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विकास गायकवाड यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 461, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.