भूम : एसटीमध्ये प्रवासी का घेतला नाही म्हणून एका प्रवाश्याने चालकास बेदम मारहाण केल्याची घटना भूम बस स्थानकावर घडली. याप्रकरणी भूम पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी नामे- मिनीनाथ नरके, रा. सुकटा ता. भुम जि. धाराशिव यांनी दि. 28.11.2023 रोजी 07.25 वा. सु. चिंचोली बसस्थानक व भुम बसस्थानक येथे फिर्यादी नामे- विजय पांडुरंग बनसोडे, वय 54 वर्षे, व्यवसाय- बस चालक बॅच नं 40197 भुम आगार रा. गिरवली ता. भुम जि. धाराशिव यांना नमुद आरोपी हा बस आडवून फिर्यादीस म्हणाला की “तु सुकटा येथील एक पॅसेंजर एस. टी. मध्ये का घेतला नाही”असे म्हणून शिवीगाळ करुन काठीने लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी देवून शासकिय कामात अडथळा निर्माण केला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- विजय बनसोडे यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 353, 341, 323, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
धाराशिव : मयत नामे- मच्छिंद्र गोरोबा वाघमारे, वय 60 वर्षे, रा. रमाईनगर, धाराशिव ता. जि. धाराशिव हे दि.19.11.2023 रोजी सायंकाळी 06.45 वा. सु. गपाट दवाखान्याचे समोर सेंन्ट्रल बिल्डींग ते बसस्थानक जाणारे रोडवर धाराशिव येथुन पायी जात होते. दरम्यान अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून मच्छिंद्र वाघमारे यांना जोराची धडक दिली. या आपघातात मच्छिंद्र वाघमारे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी- सुमन मच्छिंद्र वाघमारे, वय 55 वर्षे, यांनी दि.28.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम-279, 337, 338, 304 (अ), सह मोवाका कलम 134, 184 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.