येरमाळा : मयत नामे- नितीन जगन्नाथ औंडकर, वय 50 वर्षे, रा. चिंचोली ता. भुम जि.धाराशिव हे दि.29.03.2024 रोजी 15.30 ते 16.00 वा. सु. नांदगाव ते तेरखेडा जाणारे रोडवरुन मोटरसायकल वरुन जात होते. दरम्यान सोनालिका कंपनीचा ट्रॅक्टर क्र एमएच 25 बीए 3340 चा चालक आरोपी नामे- जयराम नवनाथ सारुक, रा. नांदगाव ता. वाशी जि. धाराशिव यांनी त्याचे ताब्यातील ट्रॅक्टर हा हायगई व निष्काळजीपणे चालवून नितीन औंडकर यांच्या मोटरसायकलला समोरुन धडक दिली. या अपघातात नितीन औंडकर हे गंभीर जखमी होवून मयत झाले.तसेच नमुद ट्रॅक्टर चालक हा जखमीस उपचार कामी घेवून न जाता पसार झाला. अशा मजकुराच्या पोलीस स्टेशन येरमाळा येथे दाखल असलेल्या अपघाती मृत्यु क्र 18/2024 मध्ये तपासात निष्पन्न झाल्याने फिर्यादी नामे- सुर्यजीत वाल्मीक कदम, वय 26 वर्षे नेमणुक पोलीस ठाणे कळंब यांनी दि.30.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 337, 338, 304(अ) सह 184, 134 (अ) (ब) मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी : मयत नामे- धनराज पापन्ना कासले, वय 36 वर्षे, रा. ऐकंबा ता. औराद बारळी, जि बिदर, राज्य कर्नाटक हे दि.29.04.2024 रोजी 02.30 वा. सु. हायवा क्र एमएच 12 व्ही टी 4468 हा घेवून ईट येथुन जात असताना धनराज कासले हे नैसर्गिक विधीसाठी साइडला हायवा थांबवून खाली उतरले होते. दरम्यान हायवा क्र एमएच 23 एयु 3300 चा चालकाने त्याचे ताब्यातील हायवा हा हायगई व निष्काळजीपणे चालवून धनराज कासले यांना धडक दिली. या अपघातात धनराज कासले हे गंभीर जखमी होवून मयत झाले. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे राजेंद्र गुरन्ना कासले, वय 36 वर्षे, रा. ऐकंबा ता. औराद बारळी, जि. बिदर राज्य कर्नाटक यांनी दि.29.04.2024 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
गावशिवारात आरडा ओरड करणाऱ्या मद्यपीवर गुन्हा दाखल
तुळजापूर :आरोपी नामे- रवि विलास शिंदे, वय 22 वर्षे, रा. शुक्रवार पेठ तुळजापूर ता. तुळजापूर जि. धाराशिव हे दि.29.04.2024 रोजी 22.30 वा. सु. डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक तुळजापूर येथे रोडवर मद्यधुंद अवस्थेत आरडा ओरड करून गोंधळ घालताना उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय तुळजापूर च्या पथकास मिळून आला. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द म.द.का. कलम 85(1) अन्वये तुळजापूर पो ठाणे येथे गुन्हा नोंदवला आहे.