• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

admin by admin
March 27, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : लुटीच्या मालासह दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
0
SHARES
247
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यातील डिकसळ पाटीजवळ झालेल्या जबरी चोरीप्रकरणी दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.

दिनांक 26 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार आणि त्यांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील अभिलेखा वरील गुन्हे उघडकीस आणण्यासाठी रवाना झाले होते. त्यांना गोपनीय माहिती मिळाली की, पोलीस ठाणे कळंब हद्दीत डिकसळ पाटी जवळील जबरी चोरीतील आरोपी कळंब पारधी पिढी येथे आहेत.

तात्काळ कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संशयित आरोपी लल्ल्या उर्फ अनिल बादल शिंदे (रा. मोहा पारधी पिढी कळंब) आणि मिर्च्या उर्फ आकाश रवि काळे (रा. कळंब पारधी पिढी कळंब) यांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी डिकसळ पाटीजवळ एका पती-पत्नीला आडवून सोन्याचे दागिने लुटल्याची कबुली दिली.

तपासादरम्यान आरोपींनी चोरी केलेला मुद्देमाल साथीदार गंगाराम बापू पवार याच्या मदतीने केज येथील सोनाली काळे या बहिणीकडे सुपूर्द केला होता. सोनालीने तो मुद्देमाल केज येथील एका सोनाराला विकला होता. पोलीस पथकाने केज येथे जाऊन सोन्याचे कर्णफुले, मंगळसूत्र, मणी असे एकूण 4.5 ग्रॅम वजनाचे आणि 27,000 रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त केले.

चौकशीत आरोपींनी युसुफवडगाव (जि. बीड) येथे देखील जबरी चोरी केल्याचे उघड झाले. जप्त मुद्देमाल आणि ताब्यात घेतलेले आरोपी पुढील कार्यवाहीसाठी कळंब पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुदर्शन कासार, सपोफौ वलीउल्ला काझी, पोहेका शौकत पठाण, प्रकाश औताडे, फरहान पठाण, जावेद काझी आणि चापोका रत्नदीप डोंगरे यांच्या पथकाने केली.

 

Previous Post

धाराशिव : रस्त्यावर पैसे मागण्याच्या कारणावरून युवकाची हत्या

Next Post

तुळजापूर : कापड दुकानातून 20 साड्या लंपास, तीन महिला आणि एक पुरुष संशयित

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

तुळजापूर : कापड दुकानातून 20 साड्या लंपास, तीन महिला आणि एक पुरुष संशयित

ताज्या बातम्या

तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

धाराशिवच्या 139 गावांसाठी 10 कोटींचा निधी मंजूर; अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्त्यांचा विकास होणार

July 23, 2026
“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

“खायला भरपूर जागा आहे!” जिल्हा परिषदेत ‘मल्टी-कुझिन’ बुफे; पण शाळकरी पोरांच्या नशिबी मात्र गळकी छत!

July 23, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

पश्चिम महाराष्ट्रातील ५० टीएमसी पूरपाणी मराठवाड्यात वळविण्याच्या प्रकल्पाला गती

July 23, 2026
धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाच्या स्थापनेला गती; मुंबईच्या पथकाकडून प्रस्तावित जागेची पाहणी

July 23, 2026
जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निषेध

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!