तामलवाडी : फिर्यादी नामे- भारत वसंत कोळगे, वय 56 वर्षे, रा. तामलवाडी, ता. तुळजापूर जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कोयंडा अज्ञात व्यक्तीने दि. 08.11.2023 रोजी 00.30 ते 01.45 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन कपाटातील ड्रव्हर मधील 45 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, व रोख रक्कम 6,000₹ असा एकुण 96,000₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी- भारत कोळगे यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन तामलवाडी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
भूम : फिर्यादी नामे- गणेश ज्ञानेश्वर माळी, वय 43 वर्षे, रा. लक्ष्मी नगर भुम ता. भुम जि. धाराशिव यांची अंदाजे 25,000₹ किंमतीची एच एफ डिलकृस कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 एसी 7692 ज्याचा इंलिन नं HA11EJF9E31077, चेसी नं MBKH11ATF9E 01389 असा असलेली ही दि. 02.11.2023 रोजी 18.00 वा. सु. पारधी पिढीच्या समोरील कमाणी जवळ पाण्याच्या टाकीजवळ भुम येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- गणेश माळी यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मुरुम : दि. 08.011.2023 रोजी 03.00 ते 04.00 वा. सु. अचलेर येथील किसान तुकाराम सोमवंशी यांचे गाळ्यात भाड्याने दिलेलृया इंडीया 01 कंपनीची एटीएम मशीन ही गॅस कटरच्या सहाय्याने फोडून व कॅमेऱ्याचे नुकसान करुन एटीएम मशीन मधील रोख रक्कम 7,07,000₹ ही अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे-बापुसाहेब नामदेव पाटील, वय 36 वर्षे, रा. लिंगीवरे ता. आटपाडी जि. सांगली ह.मु. अनिल देशमुख बंगलो संस्कृती नगर बायपास रोड लातुर ता. जि.लातुर यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन मुरुम पो. ठाणे येथे कलम 461,380,427 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग : फिर्यादी नामे- मधुकर गणपती घोडके, वय 48 वर्षे, रा. अतिथी लॉज चे शेजारी प्राध्यापक कॉलनी नळदुर्ग ता. तुळजापूर जि. धाराशिव यांची अंदाजे 4,00,000₹ किंमतीची ईरटिका कार क्र एमएच 25 आर 6118 ही दि. 07.11.2023 रोजी 01.01 ते 07.00 वा. सु. मधुकर घोडके यांचे राहाते घरासमोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. अशा मजकुराच्या फिर्यादी- मधुकर घोडके यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.