धाराशिव : आरोपी नामे- 1) युवराज पांडुरंग कानाडे, 2) तेजस यंवराज कानडे रा. वरुडा ता. जि. धाराशिव यांनी दि.024.10.2023 रोजी वरुडा येथे फिर्यादी नामे- लालासाहेब विलास कानडे, वय 37 वर्षे, रा. वरुडा, ता. जि. धाराशिव यांना पाणी घरासमोर गेल्याचे कारणावरुन नमुद आरोपीनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी गजाने, व काठीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादी यांची पत्नी या व वडील हे भांडण सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करुन दगड मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- लालासाहेब कानडे यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धाराशिव ग्रामीण पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
फसवणुक
भूम : आरोपी नामे-लक्ष्मी राजेंद्र ढगे, वय 51 वर्षे, 2) सचिन राजेंद्र ढगे, 3) विक्रम राजेंद्र ढगे, रा. वाशी ता. वाशी, 4) विशाल सर्जेराव ढगे, 5) बाबा विठ्ठल अंधारे, 6) दशरथ अंबादास सांगळे रा. ढगे चिंचपुर ता. भुम, 7) चंद्रकांत मधुकर चेडे रा. वाशी ता. वाशी यांनी दि. 19.11.2020 ते आज पर्यंत फिर्यादी नामे- भागुबाई शिवाजी काळे, वय 72 वर्षे रा. पारधी पिढी भुम ता. भुम जि. धाराशिव ह्या यांचे ग्रामपंचायत मिळकत क्र. 658 चे नमुद आरोपींनी बनावट दस्त एैवज तयार करुन ताबा घेण्याचा प्रयत्न करुन फिर्यादीची फसवणुक केली. अशा मजकुराच्या फिर्यादी- भागुबाई काळे यांनी दि.08.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 420, 463, 464, 468, 471, 34 भा.दं.वि.सं. सह अं.जा.ज.अ.प्र. 3(1) (छ) (ई) (त) (थ) (प) (य), 2 (1), 2(5) 2 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.