मुरुम – उमरगा तालुक्यातील कडदोरा येथे शेतीच्या रस्त्याच्या कारणावरून एका ३५ वर्षीय महिलेला सहा जणांनी मिळून शिवीगाळ व मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुरुम पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनुसया बालाजी रणखांब (वय ३५ वर्षे, रा. कडदोरा, ता. उमरगा) यांना आरोपी गोविंद गजेंद्र हत्तरगे, परमेश्वर व्यंकट हत्तरगे, रुक्मीनी गोविंद हत्तरगे, गोजर व्यंकट हत्तरगे, ज्ञानेश्वर व्यंकट हत्तरगे, आणि शारदाबाई बालाजी काळे (सर्व रा. कडदोरा) यांनी ४ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास कडदोरा शिवारातील शेत सर्वे नंबर २२० मध्ये गाठले.
शेत रस्त्याच्या कारणावरून वाद घालत या सर्वांनी गैरकायद्याची मंडळी जमवून अनुसया रणखांब यांना शिवीगाळ केली, लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केले आणि जिवे ठार मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
या घटनेनंतर अनुसया रणखांब यांनी ५ एप्रिल २०२५ रोजी मुरुम पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून नमूद सहा आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १८९(२), १९०, १९१(२), ११५(२), ३५२, ३५१(२),(३) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मुरुम पोलीस करत आहेत.