धाराशिव – साईबाबा ट्रेडर्स म्हणलं की भक्ती, श्रद्धा, प्रसाद… पण वडार गल्लीतल्या या दुकानात मिळत होता ‘विमलचा प्रसाद!’
धाराशिव लाइव्हच्या दणक्यानंतर शहर पोलिसांनी थेट गुटख्याच्या अड्ड्यावर धाड टाकली आणि सापडलं तब्बल ७३,००३ रुपयांचं सुगंधी साम्राज्य!
📍 घटना स्थळ: साईबाबा ट्रेडर्स, वडार गल्ली
📆 वेळ: 8 एप्रिल, दुपारी 12:45
📜 गुन्हा नोंद: रात्री 10:47 वाजता
👮♂️ फिर्यादी: विष्णु बेळे, पोलीस नाईक
👬 आरोपी:
- ओंकार वाघमारे – व्यवसाय: मजुरी
- पवन प्रकाश कदम – खास ओळख: स्वतःला पोलीस टाइम्सचा पत्रकार म्हणवणारा ‘गुटखा रिपोर्टर’!
विशेष नमूद:
पवन कदम या इसमाची ही “गुटखा पर्वात” तिसरी रेड असूनही तो अद्याप पत्रकार म्हणवून गुटख्याचं पी.आर. काम करत होता.
“Breaking News” म्हणायचं तर या पत्रकाराच्या दुकानावरच दरवेळी “ब्रेकिंग” रेडचं झडतंय!
मिळालेला माल:
- डायरेक्टर स्पेशल, शॉट 999, विमल, गोवा 1000, राजनिवास…
- रंगीबेरंगी पुड्यांचा असा ढीग लागला की वाटलं गुटख्याचं फॅशन शो भरवलाय!
- एकूण किंमत: ₹73,003/- चा बेकायदेशीर माल
पोलीस तपास:
पोनि शेख यांच्या मार्गदर्शनाखाली तपास मिसाळ साहेबांकडे. आरोपींच्या तोंडाला विमल असला तरी कायद्याच्या पुढे ते काही “मौनव्रत” पाळू शकणार नाहीत!
धाराशिव लाइव्हचं कटाक्ष निरीक्षण:
साईबाबा ट्रेडर्स नावाखाली साईबाबांचा अपमान… आणि पत्रकारितेच्या नावे गुटख्याचा धंदा – हे दोन्ही धाराशिवच्या जनतेला फसवण्याचे प्रकार!
हे पाहता पत्रकारितेच्या सन्मानासाठीही आता “रेड अॅलर्ट” आवश्यक झाला आहे!