• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 चोरखळीतील ‘कला केंद्रात’ रसिकांचा कहर, पोलिसांनाच दिला ‘प्रसादाचा’ आहेर!

admin by admin
April 9, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
 चोरखळीतील ‘कला केंद्रात’ रसिकांचा कहर, पोलिसांनाच दिला ‘प्रसादाचा’ आहेर!
0
SHARES
3.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

येरमाळा : मंडळी, कला आणि कलाकारांची कदर करण्यासाठी रसिक मायबाप कुठून कुठून येतात! याचंच एक ‘उत्कृष्ट’ उदाहरण कळंब तालुक्यातील चोरखळी गावात नुकतंच पाहायला मिळालं. इथं धाराशिव कारखान्याच्या कुशीत एक ‘कालिका कला केंद्र’ नावाचा जणू कलेचा महासागरच उभा आहे. पण थांबा! नावावर जाऊ नका. आत गेल्यावर कळतं की, कलेच्या नावाखाली डॉल्बीचा दणदणाट आणि त्यावर थिरकणाऱ्या काही महिला भगिनी आहेत. आणि त्यांच्या ‘कलेवर’ फिदा होऊन आंबटशौकीन मंडळी पैशांचा नुसता वर्षाव करतात म्हणे!

तर, अशा या ‘उच्च अभिरुचीच्या’ केंद्रात मंगळवारी रात्री दीड वाजता अकलूजहून खास ८-१० ‘कलोपासक’ आले होते. येताना बहुतेक त्यांनी ‘गंगाजल’ जरा जास्तच प्राशन केलं होतं, कारण केंद्रात पोहोचताच त्यांची कला थेट महिला भगिनींशी अश्लील चाळे करण्यापर्यंत पोहोचली.

आता साहजिकच, जिथे ‘कला’ तिथे गोंधळ! हा ‘सांस्कृतिक कार्यक्रम’ पाहून कोणीतरी येरमाळा पोलिसांना पाचारण केलं. एका धाडसी पोलीस उपनिरीक्षकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण म्हणतात ना, ‘अति उत्साह अन्…’. या ‘कलाप्रेमीं’नी थेट खाकी वर्दीवरच हात साफ केला! साहेबावरच हात उगारला.

पण पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त! त्याच वेळी, जणू देवाचाच दूत यावा तसं, स्थानिक गुन्हे शाखेचं नाईट राऊंड पथक गस्तीवर होतं. गोंधळ ऐकून ते थांबले. त्यांनी मग या अकलूजच्या ‘रसिकांना’ असा काही ‘स्वागताचा आहेर’ दिला की त्यांची सगळी नशा एका मिनिटात उतरली. चार-पाच जणांना पोलिसांच्या गाडीत ‘सन्मानाने’ बसवण्यात आलं, तर बाकीचे वार्‍याच्या वेगाने पसार झाले.

आता खरी गंमत पुढे! पोलिसांना मारहाण होऊनही, महिलांवर अत्याचार होऊनही, अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही! महिला बिचाऱ्या भीतीने तक्रार द्यायला तयार नाहीत आणि ज्या उपनिरीक्षकांना मार बसला, तेही ‘शांतम् पापम्’ म्हणत गप्प बसले आहेत.

कारण? अहो, कानात सांगितलेली गोष्ट आहे, ही अकलूजची गँग म्हणे एका मोठ्ठ्या राजकीय नेत्याच्या खास मर्जीतली आहे! आता बोला! जिथे नेताजींचा वरदहस्त, तिथे पोलिसांचा काय पाड लागणार?

तर मंडळी, चोरखळीच्या या ‘कला केंद्रा’त सध्या कलेपेक्षा ‘पॉवर’चाच खेळ जास्त रंगलेला दिसतोय! बाकी तुम्ही सुज्ञ आहात!

Previous Post

धाराशिव लाइव्हच्या बातमीचा दणका: शहरात ७३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

“साईबाबा ट्रेडर्सचं दर्शन घेतलं… तर तोंडात विमलचा वास आला!”

Next Post
धाराशिव लाइव्हच्या बातमीचा दणका: शहरात ७३ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

"साईबाबा ट्रेडर्सचं दर्शन घेतलं... तर तोंडात विमलचा वास आला!"

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group