• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये जातीयवादी टिप्पणी आणि मारहाणीप्रकरणी दोघा भावांवर गुन्हा दाखल

admin by admin
April 18, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
येरमाळ्यात कोयत्यासह दोघांना अटक; शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव:  डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त  ठेवलेल्या स्टेटसवरून झालेल्या वादातून जातीयवादी टिप्पणी करून मारहाण व धमकी दिल्याचा आरोप करत एका १७ वर्षीय तरुणाने दिलेल्या फिर्यादीवरून दोन भावांविरुद्ध ढोकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना धाराशिव जिल्ह्यातील भिकारसारोळा गावात १४ आणि १५ एप्रिल २०२५ रोजी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिकारसारोळा येथील रहिवासी प्रणव विठ्ठल मेदने (वय १७ वर्षे ७ महिने,) याने फिर्याद दिली आहे. फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, १४ एप्रिल रोजी त्याचा मित्र नारायण अंगद मुळे (रा. भिकारसारोळा ) याने प्रणवने इंस्टाग्रामवर ठेवलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या स्टेटसवर ईमोजी (प्रतिक्रिया ) दिली. त्याच दिवशी दुपारी सुमारे तीन वाजता प्रणव गावातील टाकीवर पाणी भरत असताना नारायण तेथे आला आणि जातीयवादी टिप्पणी करून निघून गेला.

दुसऱ्या दिवशी, १५ एप्रिल रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास, प्रणव गावातील शिवाजी चौकात बसलेला असताना नारायण मुळे पुन्हा तेथे आला. त्याने  जातीयवादी टिप्पणी केली. फिर्यादीनुसार, या बोलण्याचा राग आल्याने प्रणव आणि नारायण यांच्यात झटापट झाली. यावेळी नारायणने मारहाण करण्याचा प्रयत्न केला आणि झटापटीदरम्यान तो दगडावर व नंतर सिमेंटच्या कट्ट्यावर पडला, ज्यामुळे त्याच्या डोक्याला आणि हाताला दुखापत झाली.

याचवेळी नारायणचा भाऊ पंकज मुळे तेथे आला आणि त्याने जमावाला उद्देशून “याला धरा, याला लय माज आलाय” असे म्हणून शिवीगाळ केली. तसेच, प्रणव घरी गेल्यानंतरही “बोलवा त्याला, लय माज आलाय त्याला” अशी धमकी दिली, असे फिर्यादीत नमूद आहे.

प्रणव मेदने याने १७ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ११ मिनिटांनी ढोकी पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली. या तक्रारीवरून पोलिसांनी नारायण अंगद मुळे आणि पंकज मुळे यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ ची कलमे 115, 352, 351(2), 351(3), 3(5) आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ चे कलम 3(1)(r) व 3(1)(s) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

Previous Post

येरमाळा येडेश्वरी यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट; दर्शनासाठी आलेल्या दोन महिला भक्तांचे दागिने, रोकड व मोबाईल लंपास

Next Post

धाराशिव: आई-वडील नसलेल्या सुनेसाठी शेतकऱ्याने लग्नात पाठवलं हेलिकॉप्टर

Next Post
धाराशिव: आई-वडील नसलेल्या सुनेसाठी शेतकऱ्याने लग्नात पाठवलं हेलिकॉप्टर

धाराशिव: आई-वडील नसलेल्या सुनेसाठी शेतकऱ्याने लग्नात पाठवलं हेलिकॉप्टर

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group