• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 2, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास

admin by admin
November 2, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : धाराशिव जिल्ह्यातील उमरगा, आनंदनगर, येरमाळा आणि बेंबळी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोरीच्या चार स्वतंत्र घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये तीन म्हशी, एक रेडा, एक म्हैस व दोन रेडी, इलेक्ट्रिक स्कुटी, मोबाईल, रोख रक्कम आणि मोटरसायकल असा लाखो रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमरगा : तीन म्हशी व एक वगार चोरीला

जहागीर आष्टा येथील शेतशिवारातून तीन म्हशी व एक वगार, असा एकूण १ लाख ३० हजार रुपये किमतीचा पशुधन अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना घडली.

फिर्यादी नागेराव राम जाधव (वय ५५, रा. जहागीर आष्टा, ता. उमरगा) यांच्या शेत गट क्रमांक ९९/अ मधून ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ ते १ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ या कालावधीत ही चोरी झाली. याप्रकरणी उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आनंदनगर : इलेक्ट्रिक स्कुटीसह मोबाईल व रोख रक्कम चोरीला

आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरेखा बालाजी जांभळे (वय ४२, रा. बॅक कॉलनी, धाराशिव) यांच्या मालकीची सुमारे ९९ हजार २०० रुपये किमतीची इलेक्ट्रिक स्कुटी चोरीला गेली.

स्कुटीसोबत मोबाईल फोन आणि १९ हजार २०० रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल चोरीला गेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या प्रकरणी सुरेखा जांभळे यांनी १ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून रेवती जाधव हिच्याविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येरमाळा : गोठ्यातून म्हैस व दोन रेडी चोरीला

पानगाव शिवारातील गोठ्यातून एक म्हैस व दोन रेडी, असा एकूण १ लाख १५ हजार रुपये किमतीचा पशुधन अज्ञात चोरट्याने लंपास केला.

फिर्यादी गणेश विश्वनाथ बेडके (वय ४१, रा. पानगाव, ता. कळंब) यांच्या शेत गट क्रमांक ३०/अ मधील गोठ्यात ही चोरी झाली. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० ते ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ या कालावधीत चोरी झाल्याचे फिर्यादीत नमूद आहे. येरमाळा पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बेंबळी : घरासमोरून ४० हजारांची मोटरसायकल लंपास

गौडगाव येथील सागर बाबा पटाडे (वय २५) यांच्या घरासमोर उभी केलेली होंडा युनिकॉर्न मोटरसायकल (क्र. एमएच २५ एयू ०२२८) अज्ञात व्यक्तीने चोरून नेली.

सुमारे ४० हजार रुपये किमतीची मोटरसायकल २९ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते ३० सप्टेंबर रोजी सकाळी ६ या कालावधीत चोरीला गेली. याप्रकरणी सागर पटाडे यांनी १ नोव्हेंबर रोजी फिर्याद दिल्यानंतर बेंबळी पोलीस ठाण्यात भा.न्या.सं. कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या चारही घटनांचा संबंधित पोलीस ठाण्यांकडून तपास सुरू असून, चोरीला गेलेल्या मुद्देमालाचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Previous Post

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

Next Post

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

Next Post
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा

November 2, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास

November 2, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान

November 1, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप

November 1, 2026

Recent Posts

  • कौटुंबिक वादातून पत्नी व सासऱ्यावर चाकूने हल्ला; परंड्यात पतीविरुद्ध गुन्हा
  • धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; म्हशी, स्कुटी, मोबाईल आणि दुचाकी लंपास
  • उमरग्यात विनापरवाना लोखंडी कोयता बाळगणाऱ्यावर गुन्हा दाखल
  • नंदगाव शिवारात २४ एकर सोयाबीनच्या बनीमला आग; शेतकऱ्याचे ११ लाखांचे नुकसान
  • परंड्यात ४२ कामगारांना डांबून ठेवून १६ ते १७ तास काम; मारहाण, धमकी देत मोबदला न दिल्याचा आरोप
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!