• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“काका-पुतणं, भावंडं आणि राजकारणाची कुस्ती!”

admin by admin
April 22, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
“राज-उद्धव पुनर्मिलाप : भांडणं पेलली, आता बंधुभावाचा बहर?”
0
SHARES
389
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

महाराष्ट्रात राजकारणाचा कुस्तीमैदान पुन्हा भरलाय… पण यावेळी रंगात आलेली कुस्ती WWEपेक्षा कमी नाही!
एकीकडे शिवसेनेचा वाघ उद्धव आणि मनसेचा बिबट्या राज पुन्हा एकाच रिंगमध्ये येणार, अशी कुजबुज आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे ‘काका’ शरद आणि ‘पुतण्या’ अजित हे एकाच शेकड्याचं गणपती मंडळ पुन्हा एकत्र बसवणार, अशी चर्चा आहे. म्हणजे राजकारणात ‘सांभाळून घ्या भावांनो, वळणं धोक्याची आहेत’ अशा पाट्या लावण्याची वेळ आलीये.

उद्धव-राज या दोघांमध्ये पूर्वी “माझ्या गल्लीत तुझं पोस्टर नको” टाईप स्पर्धा होती, आता ती “आपल्या गल्लीत भाजपचं पोस्टर कसं फाडायचं?” या अजेंड्यावर आलीये. त्यात राज ठाकरे अचानक महेश मांजरेकरच्या यूट्यूब वर भावुक होऊन म्हणतात, “वाद आहेत, पण महाराष्ट्र त्याहून मोठा आहे…” तेव्हा वाटतं, हा YouTube इंटरव्ह्यू नाही, हा ‘राज-उद्धव पुनर्मिलनाचा’ प्री-टीजर आहे!

आता दुसरी कथा – पवार वंशाचा टीव्ही सिरीयल लेव्हल प्लॉट!
काका शरद पवार आणि पुतण्या अजित पवार – एकमेकांवर आरोप करत करत जे जरा लांब गेले होते, ते आता “आपल्यात फार भांडण झालं… चला पुन्हा एकत्र येऊ” मोडमध्ये. म्हणजे ‘घरचा पवार बाहेरचा पाडळकर नको’ अशी घराणेशाहीतली घोषणा होऊ लागलीय.

या सगळ्यावर सोशल मीडियावर जबरदस्त फटकेबाजी सुरु आहे –

  • “एकत्र येण्याआधी नातेवाईकांचे आधारकार्ड तपासा.”
  • “महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या कौटुंबिक समारंभ मोफत!”
  • “काका-पुतणं एकत्र आले, आता फडणवीसकाका कुणाला भेटणार?”

एकंदरीत, सध्या राजकारण हे कुटुंबप्रेम VS कुंडलीप्रेम यांच्यात अडलंय. कोण कधी एकत्र येईल, कोण कधी वेगळं जाईल, हे इतकं अनिश्चित आहे की सास-बहू मालिकांनाही हे स्क्रिप्ट फॉलो करता येणार नाही.

राजकारण जरी चक्रीवादळात असलं, तरी प्रेक्षक मात्र मजा घेतायत – ‘नात्यांमध्ये गोंधळ, पवारांमध्ये झोंबळ आणि ठाकरे बंधूंमध्ये गोंधळ गोंधळ!’

कथानक पुढील आठवड्यात वळणार कुठे – ते पहा, ‘सत्ता संसार’ या मालिकेत!

  • बोरूबहाद्दर 
Previous Post

जुन्या वादातून पती-पत्नीवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

नळदुर्ग शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

Next Post
नळदुर्ग शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

नळदुर्ग शहरातील अर्धवट रस्त्याच्या कामामुळे नागरिक त्रस्त

ताज्या बातम्या

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group