• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जुन्या वादातून पती-पत्नीवर हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

'माझ्याकडे का बघतोस' या कारणातून एकावर हल्ला झाल्याची दुसरी फिर्याद

admin by admin
April 21, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
बेंबळी: लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव शहरातील मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका व्यक्तीवर आणि त्यांना सोडवण्यासाठी आलेल्या त्यांच्या पत्नीवर लोखंडी रॉड व दगडाने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी धारशिव शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धारशिव शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रामहारी नामदेव क्षीरसागर (वय ४०, रा. मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे, धाराशिव) यांनी दिलेल्या वैद्यकीय जबाबावरुन ही तक्रार नोंदवण्यात आली आहे. त्यानुसार, दि.१९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे, धाराशिव येथे आरोपी नामे-संजय दिलपाक, विनायक संजय दिलपाक आणि प्रणव संजय दिलपाक (सर्व रा. मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे, धाराशिव) यांनी रामहारी क्षीरसागर यांना मागील भांडणाच्या कारणावरून अडवले.

पुढे आरोपींनी रामहारी यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी रॉड व दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावेळी रामहारी यांची पत्नी सुहागिनी या भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडल्या असता, आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली.

या घटनेनंतर रामहारी क्षीरसागर यांनी वैद्यकीय जबाब नोंदवला. त्या जबाबावरुन धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि.२० एप्रिल २०२५ रोजी आरोपी संजय दिलपाक, विनायक संजय दिलपाक आणि प्रणव संजय दिलपाक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

‘माझ्याकडे का बघतोस’ या कारणातून एकावर हल्ला झाल्याची दुसरी फिर्याद

धाराशिव – धाराशिव शहरातील मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे दि.१९ एप्रिल २०२५ रोजी रात्री घडलेल्या मारहाणीच्या घटनेप्रकरणी आता परस्परविरोधी तक्रार दाखल झाली आहे. या घटनेत ‘माझ्याकडे का बघतोस’ या क्षुल्लक कारणातून एका व्यक्तीवर आणि त्याच्या मित्रावर हल्ला झाल्याची दुसरी फिर्याद धारशिव शहर पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे.

यापूर्वी याच घटनेबाबत एका गटाने मारहाण झाल्याची तक्रार दिली होती, त्यावरुन गुन्हा दाखल आहे. आता दुसऱ्या गटाने दिलेल्या तक्रारीनुसार, संजय शिवाजी दिलपाक (वय ४०, रा तुळजापूर नाका सोनाई हॉटेलच्या पाठीमागे धाराशिव) यांनी धारशिव शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दि.१९ एप्रिल २०२५ रोजी रात्री ९ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे, धाराशिव येथे आरोपी नामे- रामहारी नामदेव क्षीरसागर आणि सुहागिनी रामहारी क्षीरसागर (दोघे रा. मोरया हॉस्पिटलच्या पाठीमागे, धाराशिव) यांनी फिर्यादी संजय दिलपाक यांना ‘माझ्याकडे का बगतोस’ म्हणून या कारणावरून अडवले.

पुढे आरोपी रामहारी आणि सुहागिनी यांनी संजय दिलपाक यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, दगडाने मारहाण करुन जखमी केले. यावेळी संजय यांचा मित्र असाविनाश विधाते हे भांडण सोडवण्यासाठी मध्ये पडले असता, नमूद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण करुन जखमी केले. तसेच दोघांनाही जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे.

संजय शिवाजी दिलपाक यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन धारशिव शहर पोलीस ठाण्यात दि.२० एप्रिल २०२५ रोजी आरोपी रामहारी नामदेव क्षीरसागर आणि सुहागिनी रामहारी क्षीरसागर यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

एकाच घटनेबाबत दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रारी दाखल केल्या असून, धारशिव शहर पोलीस दोन्ही प्रकरणांचा समांतर तपास करत आहेत.

Previous Post

वाघोलीत दोन गटांत हाणामारी; दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल

Next Post

“काका-पुतणं, भावंडं आणि राजकारणाची कुस्ती!”

Next Post
“राज-उद्धव पुनर्मिलाप : भांडणं पेलली, आता बंधुभावाचा बहर?”

"काका-पुतणं, भावंडं आणि राजकारणाची कुस्ती!"

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!