• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, December 2, 2025
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

उमरगा बायपासवर प्रवाशाला मारहाण करून लुटले; तिघा अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल

admin by admin
April 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
449
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

उमरगा: धाराशिव जिल्ह्यातील उमरगा शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ बायपास रोडवर पहाटेच्या सुमारास एका प्रवाशाला तिघा अज्ञात आरोपींनी जबर मारहाण करून लुटल्याची गंभीर घटना घडली आहे. या घटनेत प्रवासी गंभीर जखमी झाला असून, आरोपींनी रोख रक्कम, मोबाईल फोन आणि महत्त्वाची कागदपत्रे लुटून नेली.

याबाबत आदिनाथ निवृत्ती गायकवाड (वय ५५, रा. जवळगाबेट, ता. उमरगा, जि. धाराशिव, ह.मु. समता नगर, मुबारकपुर, ता. निलंगा, जि. लातुर) यांनी उमरगा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आदिनाथ गायकवाड हे २३ एप्रिल २०२५ रोजी पहाटे ००.१५ वाजेच्या सुमारास उमरगा बायपासवरील चौरस्ता येथे वाहनाची वाट पाहत उभे होते.

यावेळी ॲटो रिक्षातून आलेल्या तीन अज्ञात इसमांनी त्यांना जबरदस्तीने ॲटोत बसवले आणि उमरगा बायपास रोडवरून कोरेगावाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर नेले. या ठिकाणी आरोपींनी आदिनाथ गायकवाड यांना लाथाबुक्यांनी, चाकुने व लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली, ज्यात ते गंभीर जखमी झाले.

मारहाण केल्यानंतर आरोपींनी फिर्यादीजवळील बॅगमधील रोख रक्कम ५,५५० रुपये, दोन मोबाईल फोन आणि काही कागदपत्रे जबरीने लुटून घेऊन पसार झाले. या घटनेनंतर आदिनाथ गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(४)(६), ११८(२), १३७(२) आणि ११५(२) अन्वये तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेने उमरगा परिसरात खळबळ उडाली असून, पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. प्रवाशांनी रात्रीच्या वेळी किंवा पहाटेच्या सुमारास निर्जनस्थळी थांबताना सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Previous Post

धाराशिव: भरदिवसा घरफोडी, ४.४७ लाखांचा मुद्देमाल लंपास

Next Post

कळंब बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात गर्दीचा फायदा घेऊन महिलेचे सोन्याचे दागिने लंपास

ताज्या बातम्या

कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

धाराशिव जिल्ह्यात सरासरी ६८.९७ टक्के मतदान; तुळजापूर ‘टॉप’ तर धाराशिव ‘तळाला’, २१ डिसेंबरला फुटणार निकालाचे फटाके!

December 2, 2025
तुळजापुरात मतदानाचा ‘बंपर’ धमाका! ८०.२८ टक्के मतदानाने उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद

तुळजापुरात मतदानाचा ‘बंपर’ धमाका! ८०.२८ टक्के मतदानाने उमेदवारांचे भवितव्य मशिनमध्ये बंद

December 2, 2025
कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

कळंब नगरपरिषद निवडणूक: शहरात विक्रमी ७२.६९ टक्के मतदान; दिग्गजांचे भवितव्य ईव्हीएममध्ये बंद!

December 2, 2025
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

ब्रेकिंग न्यूज: धाराशिव नगर परिषद निवडणुकीची मतमोजणी लांबणीवर; आता थेट २१ डिसेंबरला निकाल!

December 2, 2025
धाराशिव जिल्हा मजूर फेडरेशनवर महायुतीचा झेंडा

​धाराशिव नगर परिषद निवडणूक: मतदानाच्या पूर्वसंध्येला ‘फेक एक्झिट पोल’ने खळबळ; सोशल मीडिया पेजेसवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

December 1, 2025
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group