धाराशिव : धाराशिव शहरात रात्रगस्ती दरम्यान संशयितरित्या फिरणाऱ्या तीन इसमांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ताब्यात घेऊन शहर पोलिसांच्या हवाली केले आहे.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 23.11.2023 रोजी 19.00 वा.सु. धाराशिव शहरात गस्तीस असताना शहरातील वन विभाग कार्यालयाच्या पाठीमागे तुळजापूर रोड धाराशिव येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या एक इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले नाव- 1) अक्षय उर्फ अखिल्या मारुती उर्फ मारतुल्या शिंदे, वय 25 वर्षे, रा. शिवाजी चौक बॅक कॉलनी निलंगा ता. निलंगा जि. लातुर असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यानी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने तो माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यास ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तीविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दि. 23.11.2023 रोजी 20.10 वा.सु. धाराशिव शहरात गस्तीस असताना शहरातील आयुर्वेदीक कॉलेजच्या पाठीमागे धाराशिव येथे अंधाराचा दबा धरुन बसलेल्या दोन इसमास संशयावरुन पथकाने हाटकले. यावर त्यांची विचारपुस केली असता त्यांनी आपले नाव- 1) एरिअल मारुती उर्फ मारतुल्या शिंदे, वय 27 वर्षे, रा. शिवाजी चौक बॅक कॉलनी निलंगा ता. निलंगा जि. लातुर 2) कार्तीक रिशु भोसले, वय 31 वर्षे रा. बायपास रोड कळंब ता. कळंब जि. धाराशिव असे सांगीतले. पोलीसांनी अशा रात्री अवेळी फिरण्याचे कारण विचारले असता त्यांनी पोलीसांना उडवाउडवीची उत्तरे दिल्याने ते माला विरूध्द गुन्हा करण्याच्या उद्देशाने तेथे फिरत असल्याचा पोलीसांचा संशय बळावल्याने त्यांना ताब्यात घेउन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र पोलिस कायदा कलम- 122 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि शैलेश पवार, पोहेका/1166 हुसेन सय्यद , पोना/1569 अमोल चव्हाण यांनी केली.
चोरी
धाराशिव : फिर्यादी नामे- शरद उध्दवराव पवार, वय 43 वर्षे, रा. शिवाजीनगर बाळे सोलापूर, ता. उत्तर सोलापूर जि. सोलापूर यांचे सीएनएच इंडस्ट्रीयल इंडीया लिमीटेड कंपनीचे केस 4000 सिरीज लाल व काळ्या रंगाचे उसतोडणी हार्वीस्टर चेसी नं PNEY4000EJ2MA0364 व इंजिन नं 81K84826208 असे असलेले किंमत अंदाजे 14,00,000₹ किंमतीचे दि.18.10.2023 रोजी 22.00 ते दि. 19.10.2023 रोजी 09.00 वा. सु. शिंगोली येथील संभाजी नगर हायवे रोडचे रायगड धाब्याचे बाजूस धाराशिव येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेले.अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- शरद पवार यांनी दि.23.11.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.