नळदुर्ग : नळदुर्ग-उमरगा रस्त्यावर हॉटेलसमोर चिलीममधून गांजा ओढणाऱ्या सराईत गुन्हेगाराला नळदुर्ग पोलिसांनी रंगेहाथ पकडले आहे. दिनकर प्रभाकर सुरवसे, उर्फ पप्पू डॉन (वय ४३, रा. जळकोट, ता. तुळजापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार, दिनांक ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ७:३० वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. नळदुर्ग-उमरगा रस्त्यालगत असलेल्या गारवा हॉटेलसमोर, जळकोट येथे पप्पू डॉन हा चिलीममध्ये गांजा भरून सेवन करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला गांजा ओढताना पकडले.
या प्रकरणी, नळदुर्ग पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. आरोपी दिनकर सुरवसे उर्फ पप्पू डॉन याच्या विरोधात नळदुर्ग पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा (एन.डी.पी.एस अॅक्ट १९८५) कलम ८ (क) आणि २७ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.