• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, July 27, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत

admin by admin
May 31, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव: सोन्याचे दागिने व चार मोटरसायकल चोरणारे दोन आरोपी अटकेत
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : स्थानिक गुन्हे शाखेने एका मोठ्या कारवाईत सोन्याचे दागिने आणि चार मोटरसायकली चोरणाऱ्या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई तुळजापूर येथील अपसिंगा रोडवर गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. आरोपींकडून एकूण १,७५,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक धाराशिव जिल्ह्यात पेट्रोलिंग करत असताना, काही इसम चोरीचे दागिने आणि मोटरसायकल विकण्यासाठी तुळजापूरच्या अपसिंगा रोडवर येणार असल्याची माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने सापळा रचून धोंडीराम महादेव शिंगाडे (वय ४२, रा. शिरताव, ता. मान, जि. सातारा) आणि अनिल हरिश्चंद्र माने (वय ३३, रा. वासुदेव गल्ली, तुळजापूर) यांना ताब्यात घेतले.

सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र अधिक चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांनी सांगितले की, सोन्याचे दागिने तुळजापूरमधून आणि मोटरसायकली धाराशिव जिल्हा, सोलापूर ग्रामीणमधील मोहोळ आणि सातारा जिल्ह्यातील म्हसवड येथून चोरल्या होत्या.

जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालात चार मोटरसायकली आणि साडेपाच ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आहेत, ज्यांची एकूण किंमत १,७५,००० रुपये आहे. या चोरीच्या घटनांसंबंधी धाराशिव शहर, ढोकी, तुळजापूर, मोहोळ (जि. सोलापूर) आणि म्हसवड (जि. सातारा) या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत. आरोपी आणि जप्त केलेला मुद्देमाल पुढील कारवाईसाठी तुळजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीमती रितू खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक श्रीमती शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहायक पोलीस निरीक्षक सचिन खटके, अमोल मोरे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

 

Previous Post

नळदुर्ग: गांजा ओढताना ‘पप्पू डॉन’ला अटक, पोलिसांकडून गुन्हा दाखल

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: माजी नगराध्यक्षा पतीला अंतरिम जामीन; पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खोटे अपघात दाखवून विमा कंपन्यांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; उमरगा पोलिसांत धाव

July 27, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब तालुक्यात वाटवडा-वडगाव रस्त्यावर दरोडा! पुलावर दांपत्याला अडवून सोन्याचे दागिने व मोबाईल लुटला

July 27, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

तुळजापुरात ढेकरी शिवारात पोलिसांची मोठी कारवाई! ९२ हजारांचा बंदीयुक्त गुटखा आणि दुचाकी जप्त

July 27, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव शहरात भानूनगर येथे तुफान हाणामारी! पूर्ववैमनस्यातून ब्लेड व दगडाने हल्ला

July 26, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यातील हासेगाव (के) येथे दोन गटांत तुफान राडा!

July 26, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!