• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, September 17, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण, सोयाबीन, सौर पंप आणि तारा लंपास

admin by admin
June 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : जिल्ह्यात ग्रामीण भागात चोऱ्यांचे सत्र वाढले असून, उमरगा आणि वाशी तालुक्यात शेतकरी आणि शेती-साहित्य चोरांचे लक्ष्य बनले आहेत. गेल्या काही दिवसांत घडलेल्या वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी सोयाबीन, खते, सौर पंप आणि विजेच्या तारा लंपास केल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

उमरग्यात शेड फोडून सोयाबीन आणि रोकड पळवली

उमरगा तालुक्यातील मुळज येथील शेतकरी मदन विठ्ठलराव दुधभाते (वय ६५) यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी आत प्रवेश केला. ११ जून रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास घडलेल्या या घटनेत चोरट्यांनी ८ बॅग सोयाबीन, १ पोते खत आणि २,५०० रुपये रोख रक्कम असा एकूण २३,००० रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी मदन दुधभाते यांनी दिलेल्या फिर्यादीवरून उमरगा पोलीस ठाण्यात तीन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

वाशी तालुक्यात सौर पंप आणि तारांची चोरी

वाशी तालुक्यातही चोरांनी धुमाकूळ घातला आहे. पारगाव येथील शेतकरी शरद दत्तात्रय आखाडे (वय ३७) यांच्या शेतातील विहिरीवर बसवलेला सौर पंप आणि वायर असा एकूण १७,००० रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. इतकेच नाही, तर जाताना त्यांनी सौर ऊर्जेच्या दोन प्लेट्स फोडून नुकसानही केले. ही घटना १ आणि २ जून दरम्यान घडली.

दुसऱ्या एका घटनेत, तालुक्यातील नागेवाडी शिवारात शेतातील सहा पोलवरील तब्बल दीड लाख रुपये किमतीची ५०० मीटर विजेची तार अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे उघडकीस आले आहे. २८ मे रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी अमोल अश्रुबा मोटे (वय ४०) यांनी वाशी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या सर्व प्रकरणांमध्ये पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हे दाखल केले असून, आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, शेतीमालासोबतच महागडे साहित्यही चोरीला जात असल्याने ग्रामीण भागात भीतीचे वातावरण पसरले आहे.

Previous Post

“इथे मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा”; कळंबमध्ये तोतया पोलिसांचा बनाव, महिलेचे २.२ लाखांचे मंगळसूत्र लंपास

Next Post

येडशी टोल नाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ४२ वासरांची सुटका

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

येडशी टोल नाक्यावर पोलिसांची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या ४२ वासरांची सुटका

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!