• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Thursday, July 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“इथे मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा”; कळंबमध्ये तोतया पोलिसांचा बनाव, महिलेचे २.२ लाखांचे मंगळसूत्र लंपास

admin by admin
June 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
543
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : कळंब शहरात पोलीस असल्याची बतावणी करून एका ५९ वर्षीय महिलेला तब्बल २ लाख २० हजार रुपयांना गंडवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ‘या ठिकाणी एका शिक्षिकेचा खून झाला आहे, आम्ही ड्युटीवर आहोत,’ असे सांगून भामट्यांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र काढून घेण्यास भाग पाडले आणि हातचलाखीने ते लंपास केले. ही घटना गुरुवारी सकाळी शासकीय विश्रामगृहाजवळ घडली.

सविता सुबराव लांडगे (वय ५९, रा. दत्तनगर, कळंब) यांनी याप्रकरणी कळंब पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, त्या गुरुवारी सकाळी पावणेअकराच्या सुमारास कळंब-येरमाळा रस्त्यावरून दत्त मंदिराकडे पायी जात होत्या.

त्यावेळी एमएसईबी सबस्टेशनजवळ एका अनोळखी व्यक्तीने त्यांना आवाज दिला. ‘माताजी, यहाँ पे पद्मा टीचर का मर्डर हुआ है, हम पुलीसवाले है,’ असे हिंदीत सांगून त्याने आपले ओळखपत्र दाखवले. पुढे कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी गळ्यातील मंगळसूत्र काढून सुरक्षित ठेवण्यास सांगितले. त्यानंतर त्याने दुसऱ्या साथीदाराला बोलावून त्यालाही हातातील अंगठी काढून ठेवायला सांगण्याचा बनाव केला.

त्यांच्यावर विश्वास ठेवून सविता लांडगे यांनी आपले मंगळसूत्र बॅगेत ठेवले. याच संधीचा फायदा घेत भामट्यांनी हातचलाखीने बॅगेतून २५ ग्रॅम वजनाचे, अंदाजे २ लाख २० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र काढून घेतले आणि जवळच थांबलेल्या मोटारसायकलवर बसून पळ काढला.

या घटनेनंतर सविता लांडगे यांनी तात्काळ कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून, पोलिसांनी दोन अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१९(२) (चोरी) आणि ३०३(२) (लोकसेवकाची तोतयागिरी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपींचा शोध घेत आहेत.

Previous Post

शेतकऱ्यांना १३ लाखांचा गंडा, सोयाबीन खरेदी करून व्यापाऱ्यांनी केला पोबारा; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

Next Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण, सोयाबीन, सौर पंप आणि तारा लंपास

Next Post
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; शेतकरी हैराण, सोयाबीन, सौर पंप आणि तारा लंपास

ताज्या बातम्या

तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

धाराशिव जिल्ह्यात चोरीच्या चार घटना; मोटारसायकल, वीजतारा आणि डिझेल लंपास

July 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापुरात तरुणाला लोखंडी रॉड व बेल्टने बेदम मारहाण! जातीवाचक शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी

July 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंडा तालुक्यात एसटी बस अडवून चालकासह वाहकाला मारहाण!

July 23, 2026
धाराशिवमध्ये भाजपची ‘पाच मिनिटांची’ कॉमेडी आणि आमदारांच्या लेकाचा ‘घरचा आहेर’!

धाराशिवमध्ये भाजपची ‘पाच मिनिटांची’ कॉमेडी आणि आमदारांच्या लेकाचा ‘घरचा आहेर’!

July 23, 2026
नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीमाराच्या निषेधार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च

July 23, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!