• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

शेतकऱ्यांना १३ लाखांचा गंडा, सोयाबीन खरेदी करून व्यापाऱ्यांनी केला पोबारा; बार्शीतील दोघांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 13, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
673
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

वाशी : सोनारवाडी (ता. वाशी) येथील शेतकऱ्यांकडून १३ लाख २७ हजार रुपयांचे सोयाबीन खरेदी करून, पैसे न देता फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी बार्शी येथील दोन व्यापाऱ्यांविरोधात येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप भाऊराव मोरे आणि मन्नत रामलिंग तोडकरी (दोघेही रा. बार्शी, जि. सोलापूर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या दोघांनी २८ डिसेंबर २०२४ ते २० जानेवारी २०२५ या कालावधीत सोनारवाडी येथील शेतकरी नारायण वैजीनाथ घोळवे (वय ६८) व इतर शेतकऱ्यांकडून सोयाबीनचे ५५२ कट्टे खरेदी केले.

या मालाची एकूण किंमत १३,२७,८६३ रुपये होती. मालाचे पैसे काही दिवसांत देतो, असे आश्वासन देऊन या व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला. मात्र, त्यानंतर त्यांनी पैसे न देता सोयाबीन घेऊन जाऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली व विश्वासघात केला.

वारंवार पाठपुरावा करूनही पैसे न मिळाल्याने अखेर नारायण घोळवे यांनी गुरुवारी, १२ जून २०२५ रोजी येरमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संदीप मोरे आणि मन्नत तोडकरी यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम ३१८(४), ३१६(२) आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास येरमाळा पोलीस करत आहेत.

Previous Post

 धाराशिवच्या विकासाचा ‘गियर’ अडकला; पालकमंत्री आणि आमदारांमध्ये ‘लेटर-वॉर’

Next Post

“इथे मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा”; कळंबमध्ये तोतया पोलिसांचा बनाव, महिलेचे २.२ लाखांचे मंगळसूत्र लंपास

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

"इथे मर्डर झालाय, दागिने काढून ठेवा"; कळंबमध्ये तोतया पोलिसांचा बनाव, महिलेचे २.२ लाखांचे मंगळसूत्र लंपास

ताज्या बातम्या

 ‘धाराशिव लाइव्ह’च्या बातमीचा मोठा इम्पॅक्ट; शेलारांच्या बैठकीच्या यादीत अखेर बदल

तुळजापुरात भाविकांची फसवणूक करणारे दोन बोगस पुजारी जेरबंद; मंदिर प्रशासनाची मोठी कारवाई!

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिव जिल्ह्यात पोलिसांची धडक कारवाई! कळंबमध्ये लाखो रुपयांच्या वाळूसह ट्रॅक्टर जप्त; ट्रॅव्हल्स प्रवाशाचे दागिने आणि खेडमध्ये सोलर प्लेट्स लंपास

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

तुळजापूर तालुक्यात राजकीय वाद उफाळला! शिवसेना शिंदे गटाचे जि.प. सदस्य सुनील बनसोडें कडून ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार कचरू सगट यांना फार्म हाऊसवर बेदम मारहाण

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

येरमाळ्यात शेतीच्या वादातून अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा; भाऊ-बहिणीला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करत दिली जीवे मारण्याची धमकी

June 5, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

कळंब तालुक्यात खळबळ! १४ वर्षांच्या मुलाचे इस्लामपुरा डिकसळ येथून अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल

June 5, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group