• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 25, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब: अल्पवयीन मुलीवर सात वर्षे अत्याचार, वाढदिवसाला ‘गिफ्ट’ म्हणून देणाऱ्या महिलेसह दोघांवर गुन्हा

admin by admin
June 17, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब : एका अल्पवयीन मुलीला २०१७ पासून सलग सात वर्षे आय-पिलच्या गोळ्या खायला घालून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या गुन्ह्यात तरुणाला मदत करणाऱ्या आणि पीडितेला “वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते,” असे म्हणणाऱ्या एका महिलेसह दोघांवर कळंब पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पीडित २४ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१७ साली ती अल्पवयीन असल्यापासून ते ऑक्टोबर २०२४ पर्यंत गावातीलच एका तरुणाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केले. पीडिता अल्पवयीन असल्याची माहिती असतानाही आरोपी तरुणाने तिला आय-पिलच्या (गर्भनिरोधक) गोळ्या खाऊ घालून हे कृत्य केले.

या गुन्ह्यात गावातीलच एका महिलेने आरोपी तरुणाला मदत करत गुन्हा करण्यासाठी प्रोत्साहन दिले. “तुला वाढदिवसाला एका रात्रीसाठी गिफ्ट देते,” असे ती आरोपी तरुणाला म्हणाली आणि तिने पीडितेचे काहीही ऐकून घेतले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे.

या धक्कादायक प्रकारानंतर पीडितेने अखेर १६ जून २०२५ रोजी कळंब पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी तरुण आणि त्याला मदत करणाऱ्या महिलेविरोधात भारतीय न्याय संहिता कलम ६४(२)(एफ)(आय)(एम), ६९, ५५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ४, ६, आणि १६ अन्वये गुन्हा नोंदवला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (पीडितेचे नाव आणि गाव गोपनीय ठेवण्यात आले आहे).

Previous Post

धाराशिव: जमिनीच्या वादातून चेकचा गैरवापर, दोघा भावांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

Next Post

परंडा : कौटुंबिक वादातून बाप-लेकावर कोयता, दगडाने हल्ला; एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांवर गुन्हा

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा : कौटुंबिक वादातून बाप-लेकावर कोयता, दगडाने हल्ला; एकाच कुटुंबातील चौघांसह पाच जणांवर गुन्हा

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

पीक विम्याचा ‘कागदी’ खेळ: धाराशिवच्या शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्या विमा कंपन्या आणि व्यवस्थेचा बळी!

July 25, 2026
धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

धाराशिव जिल्ह्यासाठी खरीप २०२५ पीक विमा मंजूर: ३३६ कोटींची भरपाई

July 25, 2026
भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या समर्थकांवर सतीश वैद्य यांचा निशाणा

July 25, 2026
२० वर्षांच्या निस्सीम भक्तीला साद: धाराशिवच्या माने दांपत्याला मिळाला विठ्ठल-रुक्मिणी महापूजेचा मान

आषाढी एकादशी : गौरगावच्या वारकरी दांपत्याचा शासकीय महापूजेत गौरव

July 25, 2026
उमरगा पोलिसांची धडक कारवाई; नियमभंग करणाऱ्या २६१ वाहनचालकांना सव्वादोन लाखांचा दंड

लोहारा तालुक्यात विनापरवाना तलवार बाळगणारा तरुण पोलिसांच्या जाळ्यात!

July 25, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!