• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

 टिपेश्वरचा ‘पाहुणा’ आता धाराशिवचा ‘घरजावई’!

 ताडोबा-पुण्याच्या 'शिकारी' टीमला गुंगारा देणारा वाघोबा पुन्हा 'ऑन ड्युटी'; शेतकरी म्हणतात, "साहेब, पेरणी कशी करू?"

admin by admin
June 19, 2025
in विशेष बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव जिल्ह्यात वाघाची दहशत! येडशीत मुक्त संचार, दोन गाई जखमी
0
SHARES
2.1k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: काय तो डोंगर, काय ती झाडी, काय ते ५०० किलोमीटरचं वॉकिंग! सगळं ओकेमध्ये पार करून टिपेश्वरचे ‘महाराज’ अर्थात आपला लाडका वाघ आता धाराशिव जिल्ह्याचा कायमचा रहिवासी झाल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे. डिसेंबर २०२४ मध्ये आलेला हा ‘शाही पाहुणा’ आता परत जायचं नावच घेत नाहीये, उलट धाराशिवकरांच्या प्रेमात पडून इथेच ‘स्थायिक’ झाला आहे.

सुरुवातीला या पाहुण्याला परत पाठवण्यासाठी ताडोबाच्या जंगलातून खास ‘टायगर रिटर्न’ टीम दाखल झाली. दीड महिना जंगलात सफारी केली, कॅम्पिंग केलं, फोटो काढले आणि वाघाला ‘टाटा’ करून परत गेली. वाघ काही त्यांना सापडला नाही, उलट वाघानेच त्यांची चांगलीच ‘सफारी’ घडवली.

त्यानंतर पुण्याच्या हाय-टेक टीमने सूत्रे हाती घेतली. ड्रोन, कॅमेरे आणि न जाणे काय काय घेऊन आले. तब्बल तीन महिने मुक्काम ठोकला, पण वाघोबाने त्यांनाही ‘तुमचं तुम्ही बघा’ म्हणत दर्शन दिले नाही. अखेर कंटाळून पुण्याची टीमही ‘पुन्हा येईन’ न म्हणताच निघून गेली.

गेला महिनाभर वाघोबा गायब झाल्याने सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला होता. काहींना वाटले, “चला, कंटाळला वाटतं इथल्या वातावरणाला, गेला असेल परत.” पण सगळ्यांचे अंदाज चुकवत, खरिपाच्या पेरणीच्या ऐन मुहूर्तावर महाराज पुन्हा प्रकटले आहेत. तुळजापूर आणि धाराशिव तालुक्यातल्या गावांमध्ये शेतकऱ्यांना दर्शन देऊन त्यांनी आपल्या ‘अस्तित्वाची’ जाणीव करून दिली आहे.

आता शेतकरी मात्र डोक्याला हात लावून बसले आहेत. एकीकडे पेरणीची घाई आणि दुसरीकडे हा ‘बिनपगारी सुपरवायझर’ शेतात फिरतोय. काही जाणकारांनी “हा तो वाघ नाही, दुसरा आलाय,” अशी शंका उपस्थित केली होती. पण वनविभागाने “अहो, गैरसमज नको, हा तोच आपला जुना ‘हिरो’ आहे,” असं अधिकृतपणे जाहीर करून टाकलं आहे.

सध्या तरी परिस्थिती अशी आहे की, वाघ मजेत धाराशिव तालुक्यातील जागजी , सांगवी शिवारात मॉर्निंग वॉक करत आहे आणि शेतकरी “आता पेरणी करायची कशी?” या चिंतेत आहेत. एकूणच, टिपेश्वरचा हा वाघ आता धाराशिवचा ‘मानबिंदू’ बनला असून, त्याला पकडण्याचे प्रयत्न सोडून वनविभागाने त्याला ‘पर्यटन ब्रँड ॲम्बेसेडर’ घोषित करावं, अशी मागणी जोर धरू लागली आहे!

Previous Post

वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा पवनचक्की कंपन्यांवर फसवणुकीचा आरोप, २५ जूनपासून आमरण उपोषणाचा इशारा

Next Post

धाराशिवच्या रस्त्यांवर श्वानांचे राज्य: नागरिक दहशतीखाली, प्रशासनाची निद्रा कधी भंगणार?

Next Post
धाराशिवच्या रस्त्यांवर श्वानांचे राज्य: नागरिक दहशतीखाली, प्रशासनाची निद्रा कधी भंगणार?

धाराशिवच्या रस्त्यांवर श्वानांचे राज्य: नागरिक दहशतीखाली, प्रशासनाची निद्रा कधी भंगणार?

ताज्या बातम्या

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

पाटी बदलली, पण नशीब कधी बदलणार? ‘धाराशिव’च्या विकासाची गाडी खड्ड्यातच!

April 21, 2026
पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group