• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Friday, October 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

विजय गंगणे यांच्यावर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

admin by admin
July 21, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

 तुळजापूर (धाराशिव लाइव्ह): तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकारी यांना फोनवरून अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शासकीय कामकाजात अडथळा आणून मानसिक त्रास दिल्याच्या प्रकरणी तुळजापूर पोलीस ठाण्यात विजय गंगणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विजय गंगणे हे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे बंधू आणि नगरसेविका प्रियंका गंगणे यांचे पती आहेत.

डोली सुविधा तात्पुरती होती बंद

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत आनंतराव तेरखेडकर (वय ३६) हे तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत आहेत. सध्या मंदिरात पुरातत्व विभागामार्फत जतन व संवर्धनाचे काम चालू आहे, तसेच डोली मार्गावर गोमुख तीर्थाशेजारील भिंतीचे पाडकाम सुरू आहे. मार्गावर दगड पडलेले असल्याने भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने १८ जुलै २०२६ रोजी सकाळी ११.३० वाजेपासून वयोवृद्ध व दिव्यांग भाविकांसाठी असणारी ‘डोली’ (खुर्ची) सुविधा तात्पुरती बंद केली होती.

नेमका प्रकार काय घडला?

१८ जुलै रोजी दुपारी पावणे तीन ते तीनच्या सुमारास सुरज प्रताप जगताप नावाचे पुजारी कार्यालयात आले आणि त्यांनी एका अपंग भाविकासाठी डोलीची मागणी केली. कार्यालयात उपस्थित असलेले जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांनी त्यांना काम सुरू असल्याने सुविधा बंद असल्याचे समजावून सांगितले.

यानंतर पुजाऱ्याने कार्यालयाच्या बाहेर जाऊन तुळजापूर येथील विजय विलास गंगने या व्यक्तीला मोबाईलवरून फोन लावला आणि तो मोबाईल क्षीरसागर यांच्याकडे दिला. फोनवर बोलताना विजय गंगने याने डोली सुविधा बंद का आहे, अशी विचारणा करत उमाकांत क्षीरसागर आणि त्यानंतर फोनवर आलेले पीआरओ अभिजीत तेरखेडकर यांना अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. सार्वजनिक ठिकाणी मंदिर संस्थानचे काम करत असताना या व्यक्तीने फोनवरून अर्वाच्य भाषा वापरून अधिकाऱ्यांना मानसिक त्रास दिला.

गुन्हा दाखल

 याप्रकरणी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, २० जुलै २०२६ रोजी रात्री तुळजापूर पोलीस ठाण्यात विजय विलास गंगने (रा. तुळजापूर, जि. धाराशिव) याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९६ आणि ३५१(४) अन्वये गुन्हा (FIR क्र. ०३६४/२०२६) दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास हेड कॉन्स्टेबल बालाजी कामटकर हे करत आहेत.

Previous Post

धाराशिव : नगरसेवक विलास लोंढे यांच्या अपात्रतेच्या मागणीवरील सुनावणी 4 ऑगस्टला

Next Post

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

Next Post
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली

October 22, 2026
तुळजापूर नवरात्रोत्सव: भाविकांच्या सुरक्षेसाठी वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ प्रमुख मार्ग ४ ते ७ ऑक्टोबर दरम्यान बंद

तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला

October 22, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला

October 22, 2026
मुरुम येथील खून प्रकरणाचा ४८ तासांत उलगडा; जुन्या वैमनस्यातून कृत्य, एका आरोपीला अटक

मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या

October 22, 2026

Recent Posts

  • तुळजापूर नवीन बसस्थानक : बसमध्ये चढताना प्रवाशाचा खिसा कापणारी महिला रंगेहात पकडली
  • तुळजापूर शारदीय नवरात्र महोत्सव २०२६: भाविकांच्या सुरक्षेसाठी २३ ते २६ ऑक्टोबर दरम्यान वाहतूक मार्गात मोठे बदल; पर्यायी मार्ग जाहीर
  • नितळी शिवार : विनाकारण शिवीगाळ करत हातावर गुडघा दाबून तरुणाचा हात मोडला
  • कसबे तडवळे : ‘गावात लय समाजसेवा करायला काय?’ म्हणत तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला
  • मुरुम : शेतीच्या वादातून थरार; सुपतगाव रोडवर ४७ वर्षीय शेतकऱ्याची धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!