• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Sunday, June 7, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवमध्ये मद्यपीचा धिंगाणा, भररस्त्यात आरडाओरड करणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल

admin by admin
June 24, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
2.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे मोटरसायकल चालवत सार्वजनिक ठिकाणी आरडाओरड करणे एका तरुणाला चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी आनंदनगर पोलिसांनी स्वतः फिर्याद देऊन संबंधित तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

सचिन प्रविण धारुरकर (वय २९, रा. तिरुपती कॉलनी, भवानी चौक, सांजा रोड, धाराशिव) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धारुरकर हा २२ जून रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास आपल्या ताब्यातील मोटरसायकल (क्र. एमएच २५ जे ६६४८) आनंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चालवत होता. यावेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता आणि बेदरकारपणे गाडी चालवत मोठ्याने आरडाओरड करून सार्वजनिक शांततेत अडथळा निर्माण करत होता.

हा प्रकार गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास आला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन धारुरकर याच्याविरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ आणि ८५(१) चे उल्लंघन केल्याप्रकरणी आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.

मद्यधुंद अवस्थेत हायवेवर कार चालवणाऱ्या आंध्रप्रदेशच्या चालकावर गुन्हा दाखल

उमरगा : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर मद्यधुंद अवस्थेत निष्काळजीपणे आणि धोकादायकरित्या कार चालवणाऱ्या आंध्रप्रदेशातील एका चालकावर उमरगा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई २२ जून रोजी रात्री करण्यात आली.

मुल्ला व्यंकटा नरसिमा रेड्डी (वय ३५, रा. रामारेड्डी अकावेडी, प्रकाशराम, आंध्रप्रदेश) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ जून रोजी रात्री पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास आरोपी मुल्ला रेड्डी हा आपल्या ताब्यातील बलेनो कार (क्र. एमएच १२ आर.के. ६८७४) घेऊन सोलापूरहून हैद्राबादच्या दिशेने जात होता. जकेकुर गावाजवळ महामार्गावर तो अत्यंत निष्काळजीपणे आणि मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवत असल्याचे गस्तीवरील पोलिसांच्या निदर्शनास आले.

त्याच्या या धोकादायक कृत्यामुळे इतर वाहनचालकांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची शक्यता होती. पोलिसांनी तात्काळ त्याला थांबवून कारवाई केली. याप्रकरणी पोलिसांनी स्वतः सरकारतर्फे फिर्याद देऊन आरोपी मुल्ला रेड्डी याच्या विरोधात मोटार वाहन कायद्याच्या कलम १८५ अन्वये उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे. पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

लिफ्ट देणाऱ्यानेच लुटले, महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले; वाशी पोलिसांनी आरोपीला मुद्देमालासह केले अटक

Next Post

बेंबळीतील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराची तक्रार, चौकशी अधिकाऱ्यावरच पक्षपातीपणाचा आरोप

Next Post
बेंबळीच्या डॉ. झिंगाडे यांचा प्रताप: चुकीच्या उपचाराने रुग्णाच्या जीवाशी खेळ; जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

बेंबळीतील डॉक्टरांच्या चुकीच्या उपचाराची तक्रार, चौकशी अधिकाऱ्यावरच पक्षपातीपणाचा आरोप

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

धाराशिवमध्ये सोलर अन् पवनचक्कीचे साहित्य चोरणारी टोळी गजाआड; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, १० गुन्हे उघड

June 7, 2026
YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

YouTube चे क्रिएटर्ससाठी मोठे अपडेट; AI लेबल्स आणि स्टुडिओ फीचर्समध्ये महत्त्वाचे बदल

June 6, 2026
धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group