• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, June 6, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

पार्वती हॉस्पिटलच्या तोडफोड प्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
June 26, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये रुग्णालयावर जमावाचा हल्ला; डॉक्टर दांपत्याला मारहाण, वाहनांची तोडफोड
0
SHARES
2.7k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : रुग्णाला तपासले नाही, या किरकोळ कारणावरून संतप्त झालेल्या सुमारे १४ जणांच्या जमावाने शहरातील रामनगर भागातील पार्वती हॉस्पिटलमध्ये घुसून डॉक्टर दाम्पत्य आणि कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंगळवारी रात्री घडलेल्या या घटनेत जमावाने दगड, काठ्या आणि वॉकरने हल्ला करत रुग्णालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली, ज्यात सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.

याप्रकरणी डॉ. कुलदीप मोहनराव सस्ते (वय ४२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आनंदनगर पोलीस ठाण्यात जमावाविरोधात गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास डॉ. कुलदीप सस्ते यांच्या पार्वती हॉस्पिटलमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि त्यांच्यासोबत आलेले इतर दहा जण असे सुमारे १४ जण आले. त्यांनी, “पेशंटला तपासत का नाही?” असा जाब विचारत डॉ. सस्ते यांच्या पत्नीसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे रूपांतर थेट हाणामारीत झाले. जमावाने डॉक्टर पत्नीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी, दगड, काठी आणि रुग्णालयातील वॉकरने मारहाण करून जखमी केले.

हा प्रकार पाहून रुग्णालयातील इतर कर्मचारी भांडण सोडवण्यासाठी पुढे आले असता, संतप्त जमावाने त्यांनाही मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता, जमावाने रुग्णालयातील सामानाची आणि बाहेर उभ्या असलेल्या कारच्या काचांची तोडफोड करून मोठे नुकसान केले. त्यांनी डॉ. सस्ते यांना जीवे मारण्याची धमकीही दिली.

या हल्ल्याप्रकरणी डॉ. कुलदीप सस्ते यांनी आनंदनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी हल्ला करणाऱ्या अनोळखी व्यक्तींविरोधात मारहाण, दंगल, मालमत्तेचे नुकसान करणे, जीवे मारण्याची धमकी देणे यांसारखे भारतीय न्याय संहितेतील कलमांसह डॉक्टर संरक्षण कायदा (Maharashtra Medicare Act, 2010) अंतर्गतही गुन्हा नोंदवला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत आहेत. या घटनेमुळे शहरातील वैद्यकीय क्षेत्रात संतापाचे आणि भीतीचे वातावरण आहे.

Previous Post

धाराशिव जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट; घरातून लाखाचा ऐवज लंपास, तर वीजवाहिन्यांचे अँगल आणि ताराही चोरीला

Next Post

लाचखोर पोलीस निरीक्षक शेळके आणि महिला पोलीस नाईक लोखंडे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

Next Post
धाराशिव पोलिसात लाचखोरीचा थरार! ‘रक्षकच’ बनले भक्षक; पोलीस निरीक्षक आणि महिला कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात

लाचखोर पोलीस निरीक्षक शेळके आणि महिला पोलीस नाईक लोखंडे यांना एक दिवसाची पोलीस कोठडी

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

धाराशिव जिल्ह्यात गोवंश तस्करी आणि अवैध मांस विक्रीवर पोलिसांची मोठी कारवाई! लोहारा आणि उमरग्यात गुन्हे दाखल

June 6, 2026
धाराशिवमध्ये सव्वा लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

परंडा शहरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई! ६५ वर्षीय वृद्धाच्या घरातून ७८ हजारांचा प्रतिबंधित गुटखा जप्त; गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

नळदुर्गमध्ये सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फोकसवरून वाद; एकाला काठी आणि बतईने बेदम मारहाण, ५ जणांवर गुन्हा दाखल

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

बेंबळी हद्दीतील नितळी गावात शेताच्या बांधावरून धुमश्चक्री! सामाईक बांध फोडल्याच्या वादातून ५ जणांकडून प्रौढाला काठी आणि ढेकळाने बेदम मारहाण

June 6, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

धाराशिवच्या कोंड गावात जमादार कुटुंबियांमध्ये राडा! कुऱ्हाड आणि दगडांनी एकमेकांवर हल्ला; दोन्ही गटांतील १४ जणांवर गुन्हे दाखल

June 6, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group