• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

स्कॉर्पिओतून आलेल्या चोरट्यांनी सराफाला लुटले; ३ लाख ९७ हजारांचे दागिने, रोकड लंपास

admin by admin
July 9, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

परंडा: परंडा ते कुर्डुवाडी मार्गावर सोमवारी (दि. ७) सायंकाळी ७.३० वाजता एका सराफ व्यापाऱ्याला लुटल्याची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी विना क्रमांकाच्या पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओने दुचाकीला धडक देऊन आणि डोळ्यात चटणी फेकून ३ लाख ९७ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि रोकड असलेली बॅग हिसकावून नेली.

तालुक्यातील कारंजा येथील रहिवासी असलेले दशरथ गोरे यांचे परंडा शहरात सद्‌गुरू ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. सोमवारी सायंकाळी ते दुकान बंद करून आपल्या दुचाकीने गावाकडे निघाले होते. त्यांच्या बॅगेत ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि ४७ हजार रुपयांची रोकड होती.

शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असताना, मागून आलेल्या एका विना क्रमांकाच्या पांढऱ्या स्कॉर्पिओने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत ते खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला दुखापत झाली. त्यानंतर, गाडीतून उतरलेल्या चोरट्यांनी त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्या हातातील पैशांची बॅग हिसकावून घेतली व कुर्दुवाडीच्या दिशेने पसार झाले.

घटनेची माहिती मिळताच दशरथ गोरे यांनी घरी आणि सराफ असोसिएशनला संपर्क केला, त्यानंतर सराफ व्यापारी अभिजित पेडगावकर यांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक दिलीपकुमार पारेकर यांनी तातडीने तीन पोलिस पथके तयार करून आरोपींच्या शोधासाठी कुर्दुवाडी, करमाळा, आणि रोपळे या मार्गांवर रवाना केली.

स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने राबवलेल्या शोध मोहिमेदरम्यान, माढा तालुक्यातील बारलोणी परिसरात पोलिसांना एक संशयित विना नंबरची स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. पोलिसांनी ही गाडी चौकशीसाठी ताब्यात घेतली आहे.

Previous Post

परिक्षेत्रीय पोलीस कर्तव्य मेळाव्यात धाराशिव पोलीस दलाची चमकदार कामगिरी, पटकावले उपविजेतेपद

Next Post

उमरगा तालुक्यातील कवठा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा, १७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

Next Post
काक्रंबा पाटीजवळ भीषण अपघात : टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकला; चार वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, सात जण जखमी

उमरगा तालुक्यातील कवठा शिवारात जुगार अड्ड्यावर छापा, १७ लाखांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर

September 23, 2026
धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणी दौऱ्यात राडा: ठाकरे गट आणि भाजप आमनेसामने, पोलिसांकडून सौम्य बळाचा वापर
  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!