• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, September 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

कळंब सुपारी चोरी प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस ‘चोरावर मोर ‘

चोरीतील २२ पोते विकून साडेपाच लाखाची कमाई

admin by admin
December 8, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
सुधीर पाटील, विजय दंडनाईक यांच्यासह  १४ जणांवर मारहाणीचा गुन्हा दाखल
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब – शहरातील एका व्यापाऱ्याच्या गोडावूनमधून ४५ पोते सुपारी चोरीस गेली होती, स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून दोन चोरट्याना अटक केली आणि २३ पोते माल जप्त दाखवला आणि २२ पोते माल साडेपाच लाखास विकून स्थानिक गुन्हे शाखेचे दोन ते तीन पोलीस मालामाल झाल्याची चर्चा सुरु आहे.

काय आहे तक्रार ?

फिर्यादी नामे- महादेव मनोहरराव घुले, वय 60 वर्षे, रा. दत्तनगर कळंब ता. कळंब, जि. धाराशिव यांचे तांदुळवाडी रोड लगत रुणवाल बिल्डींग डिकसळ ता. कळंब येथील सुपारीचे गोडवुनचे शटरचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.01.12.2023 रोजी 05.00 ते दि. 02.12.2023 रोजी 07.00 वा. सु.तोडून आत प्रवेश करुन गोडावून मधील सुपारीचे 45 पोते एकुण 16,60,125 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- महादेव घुले यांनी दि.02.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे गुरनं 506/2023 कलम 454, 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

दोन आरोपीना अटक

स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या चोरीचा छडा लावून याप्रकरणी दोन चोरट्याना अटक केली. दोन आरोपी कल्पनानगर पारधीपिढी येथे लपून बसले आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन पोलीस पथकाने नमुद ठिकाणी जावून आरोपी नामे-1) शंकर मच्छिंद्र काळे, 2) श्रीकांत उर्फ बबलु बापु पवार दोघे रा. कल्पानगर, पारधी पिढी, कळंब ता. कळंब जि. धाराशिव यांना दि. 03.12.2023 रोजी कल्पना पारधी पिढीवरुन ताब्यात घेउन अधिक विचारपूस करता त्यांनी नमुद गुन्हा केल्याची कबुली दिल्याने नमुद आरोपी यांचे कडुन गुन्ह्यात चोरी गेलेल्या माला पैकी सुपारीचे 23 पोते,6,95,175 ₹ व निळ्या रंगाचे सोनालिका ट्रॅक्टर हेड क्र एमएच 13 BR 2587 असा एकुण 9,95,175 ₹ चा मुद्देमाल जप्त केला होता.

चोरावर मोर

कळंबमधील पारधी पेढीतील आरोपींनी काम करत असलेल्या मालकाकडून दोन ट्रॅक्टर आणून त्यावर डॉल्बी बसवून नाच केला, नंतर त्याच ट्रॅक्टर मध्ये चोरीचे ४५ पोते सुपारी बीड जिल्ह्यातील लाखा येथे नेला. तेथे ट्रॅक्टर मालकाच्या नातेवाईकास हा माल विकला होता, चोरीचा छडा लावणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ४५ पोते माल ताब्यात घेतला असताना, २३ पोते दाखवून उर्वरित २२ पोते कळंबमधील मणियार आणि धारूर येथील शेख यास साडेपाच लाखास विकून चोरावर मोर ठरले.

पोलिसांनी दोन आरोपीस अटक केली असली तरी चोरीचा माल घेणाऱ्या तीन आरोपीना अभय दिले आहे तसेच चोरीतील ट्रॅक्टर जप्त न करता, कालबाह्य झालेला जुना दुसराच ट्रॅक्टर दाखवला आहे, चोरीचा माल घेणाऱ्या आरोपीना अभय देताना त्यांच्यकडून सुद्धा पैसे उकळण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास भूम किंवा तुळजापूर डीवायएसपीकडे देऊन दोषी पोलिसांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

एका आरोपीची आत्महत्या

या प्रकरणातील मुख्य आरोपी दत्ता पवार याने आत्महत्या केली आहे, स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी छळ केल्याने त्याने आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला असून, प्रेत कळंब पोलीस स्टेशनमध्ये आणून, जोपर्यंत पोलिसांवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत अंतविधी न करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु चौकशीचे आश्वासन दिल्यानंतर प्रेत नेण्यात आले. परंतु त्याची निःपक्षपणे चौकशी होणार का ? हा प्रश्न आहे.

Previous Post

कळंबमधील चोरीतील सुपारीला पाय फुटले

Next Post

धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार

Next Post
धाराशिव – तुळजापूर – सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार

धाराशिव - तुळजापूर - सोलापूर रेल्वे मार्गाचे काम जानेवारीमध्ये सुरु होणार

ताज्या बातम्या

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026
‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!

September 19, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी

September 19, 2026

Recent Posts

  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
  • ‘उतावळा नवरा, गुडघ्याला बाशिंग’: कैलास पाटलांचा बैठकीत दणका अन् फेसबुक पिंट्याची थेट ‘दुष्काळ’ घोषणा!
  • उंडेगाव : दुचाकी अडवून “माझ्या आईला का बोलावतोस?” विचारत चाकूहल्ला; ४५ वर्षीय इसम गंभीर जखमी
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!