• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, November 23, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नळदुर्गमध्ये विकृतीचा कळस! धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीकडूनच बसस्थानकात अश्लील चाळे

admin by admin
August 6, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
नळदुर्गमध्ये विकृतीचा कळस! धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीकडूनच बसस्थानकात अश्लील चाळे
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

नळदुर्ग : समाजाला नीतिमत्तेचे धडे देणाऱ्या आणि धार्मिक शिक्षण देणाऱ्या एका मौलवीनेच सार्वजनिक ठिकाणी अत्यंत निर्लज्ज प्रकार केल्याची धक्कादायक घटना नळदुर्गमध्ये उघडकीस आली आहे. भर गर्दीच्या बसस्थानकात महिला आणि शाळकरी मुलींसमोर मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ लावून अश्लील हावभाव करणाऱ्या या विकृत मौलवीविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी एका धार्मिक शाळेत विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम करत होता, ज्यामुळे या घटनेची तीव्रता अधिकच वाढली आहे.

सुनील माणिकराव गव्हाणे (वय ३९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ही संतापजनक घटना २ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नळदुर्ग बसस्थानकात घडली. फिर्यादी हे बसची वाट पाहत असताना, तिथेच बसलेला आरोपी कासीम अब्दुल रहीम इनामदार (रा. रहीमनगर, नळदुर्ग) याने सार्वजनिक ठिकाणी बसलेल्या महिला, मुली आणि इतर नागरिकांना दिसेल अशा पद्धतीने मोबाईलवर पॉर्न व्हिडिओ सुरू केला. 

एवढ्यावरच न थांबता, तो सर्वांसमोर अश्लील हावभाव करू लागला. त्याचा हा विकृत प्रकार पाहून तेथे उपस्थित असलेल्या शाळकरी मुली आणि महिला प्रचंड घाबरल्या व लज्जेने मान खाली घालून तिथून उठून दूर गेल्या.  मात्र, या गोष्टीचा काहीही परिणाम न होता, लोकांची नीतीभ्रष्ट करण्याच्या उद्देशाने या मौलवीने आपले अश्लील चाळे सुरूच ठेवले.

हा प्रकार असह्य झाल्याने काही नागरिक पुढे आले आणि त्यांनी आरोपीला जाब विचारला. यावेळी विशाल डुकरे नावाच्या एका नागरिकाने आरोपीचा हा सर्व किळसवाणा प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद केला आहे.

या गंभीर घटनेप्रकरणी ५ ऑगस्ट २०२५ रोजी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी आरोपी कासीम इनामदार विरोधात भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २९४(१), २९४(२)(अ) आणि २९६ अन्वये गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणाचा तपास हेड कॉन्स्टेबल उमाजी पांडुरंग गायकवाड करत आहेत. पवित्र पेशाला काळीमा फासणाऱ्या या घटनेमुळे नळदुर्ग परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

Previous Post

परंड्याच्या राजकारणात ‘पॉवर’फुल भूकंप! निधीच्या ‘अर्थ’कारणाने मोटे दादांच्या गोटात

Next Post

नळदुर्ग पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह! मौलवीला वाचवण्यासाठी POCSO डावलला? तपास कॉन्स्टेबलच्या हाती

Next Post
नळदुर्गमध्ये विकृतीचा कळस! धार्मिक शिक्षण देणाऱ्या मौलवीकडूनच बसस्थानकात अश्लील चाळे

नळदुर्ग पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह! मौलवीला वाचवण्यासाठी POCSO डावलला? तपास कॉन्स्टेबलच्या हाती

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले

November 23, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

वाशी : दळवेवाडी येथील जीआर प्लॉट परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला

November 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

नळदुर्ग : उसाच्या गाडीवरून झालेल्या वादात थरार! कारला आयशरची धडक देऊन खुनाचा प्रयत्न

November 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

वाशी : बहिणीला नांदवण्याच्या वादातून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकू व लोखंडी रॉडने खुनी हल्ला

November 23, 2026
‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार

‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार

November 23, 2026

Recent Posts

  • तुळजापूर : दुचाकीस्वार चोरट्यांनी भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण हिसकावले
  • वाशी : दळवेवाडी येथील जीआर प्लॉट परिसरात तरुणावर प्राणघातक हल्ला
  • नळदुर्ग : उसाच्या गाडीवरून झालेल्या वादात थरार! कारला आयशरची धडक देऊन खुनाचा प्रयत्न
  • वाशी : बहिणीला नांदवण्याच्या वादातून ४२ वर्षीय व्यक्तीवर चाकू व लोखंडी रॉडने खुनी हल्ला
  • ‘राम नाम सत्य म्हणजे नेमके काय? हा सत्तेचा माज’; संजय शिरसाटांच्या दाव्यावर आमदार कैलास पाटील यांचा सडेतोड पलटवार
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!