कळंब : आरोपी नामे- 1) देविदास आबाराव वायसे,रा. कुंभवाडी वस्ती आढाळा ता. कळंब जि.धाराशिव यांनी दि.11.12.2023 रोजी 21.00 वा. सु. महादेव आवारात वायसे यांचे घरासमोर कुंभवाडी वस्ती आढाळा येथे फिर्यादी नामे-संभाजी आबाराव वायसे, वय 62 वर्षे, रा. कुंभवाडी वस्ती आढाळा ता. कळंब जि.धाराशिव यांना बोरचे पाणी पिण्यासाठी नेहण्याचे कारणावरुन नमुद आरोपीने शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पासाने डोक्यात मारहाण करुन गंभीर जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- संभाजी वायसे यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन कळंब पो. ठाणे येथे कलम 326, 323, 504, 506 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1)सागर माने,2)संदीप माने, 3)विशाल मंजुळे, 4) श्रीकृष्ण जाधव सर्व रा. उमरगा जि. धाराशिव यांनी दि. 11.12.2023 रोजी 10.00 वा. सु. डिग्गीगावा लगत बंजारा बार च्या बाजूस असलेल्या पान टपरी समोर उमरगा येथे फिर्यादी नामे- इस्माईल मुसा मोमीन, वय 25 वर्षे, रा. बॅक कॉलनी ता. उमरगा जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी धक्का का दिला या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, बिअर ची बॉटलने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- इस्माईल मोमीन यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
वाशी :आरोपी नामे- 1)महाविर मच्छिंद्र सुकाळे,2)बिभीषन येडबा सुकाळे, दोघे रा. पिंपळगाव लींगी ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि. 05.12.2023 रोजी 10.00 ते 19.00 वा. सु. पिंपळगाव शिवारातील शेतात फिर्यादी नामे- बालाजी मच्छिंद्र सुकाळे, वय 35वर्षे, रा. पिंपळगाव लींगी ता. वाशी जि. धाराशिव यांना नमुद आरोपींनी शेतीच्या बांधाच्या कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कुह्राडीने मारहाण करुन जखमी केले. तसेच फिर्यादचे आई, वउील व पत्नी हे भांडणसोडवण्यास आले असता नमुद आरोपीनी त्यांनाही शिवीगाळ करुन मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- बालाजी सुकाळे यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन वाशी पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
अपघातात एक ठार
उमरगा : मयत नामे-गणेशलाल गुरुनाथराव जाधव, वय 58 वर्षे, एस. टी. कॉलनी उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव हे दि.07.12.2023 रोजी सायंकाळी 19.00 वा. सु. पंचायत समिती गेट समोर उमरगा येथे उभे होते. दरम्यान मोटरसायकल के. ए.32 ईएक्स 8777 च्या चालकाने त्याचे ताब्यातील मोटरसायकल ही भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून गणेशलाल जाधव यांना धडक दिली.
या अपघातात गणेशलाल जाधव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद मोटरसायकल चालक हा जखमीस मदत न करता आपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- रोशन गणेशलाल जाधव, वय 26 वर्षे, रा. एस. टी. कॉलनी, उमरगा ता. उमरगा जि. धाराशिव यांनी दि.15.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.