धाराशिव – एम. पी. डी. ए. कायद्या अंर्तगत स्थानबध्द असलेला एक कुख्यात आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन जिल्हा शासकीय रुग्णालयातून पळाला होता. शोधाशोध केल्यानंतर तो पुन्हा सापडला असून , याप्रकरणी बंदोबस्तासाठी ठेवलेल्या पोलिसांवर कोणती कारवाई होणार ? याकडे लक्ष वेधले आहे.
धाराशिव जिल्हात चोरी ,घरफोडीचे व दरोडा असे एकुण 16 गुन्हे दाखल असलेल्या व एम. पी. डी. ए. कायद्याअंर्तगत स्थानबध्द असलेला कुख्यात आरोपी अविनाश दिलीप भोसले ( वय 24 वर्षे, रा.गायरान वस्ती, पाटोदा ता.जि.धाराशिव ) यास दि. १३ डिसेंबर रोजी ताब्यात घेणेकरीता स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस धाराशिव शहरातील साठे नगर याठिकाणी गेले असता, त्याने स्वत:चे शरीरावर चाकुने मारुन घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर त्यास ताब्यात घेवुन शासकिय रुग्णालय, धाराशिव येथे आंतररुग्ण विभागात दाखल केले असता १५ डिसेंबर रोजी रात्री आरोपी अविनाश भोसले हा उपचारा दरम्यान पोलिसांच्या हातावर तुरी देऊन रुग्णालयातुन पळुन गेला हेाता. त्यानंतर पोलिसांनी शोधशोध केल्यानंतर हा आरोपी भालगाव, ता.बार्शी जि.सेालापुर याठिकाणी एका शेतात लपून बसल्याचे समजताच पोलिसांनी त्यास पुन्हा अटक केली आहे.
पळवून लावणारे ते पोलीस कोण ?
हा कुख्यात आरोपीवर नजर ठेवण्यासाठी दोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यावेळी पोलीस नेमके काय करत होते ? असा प्रश्न विचारला जात असून, पोलिसांना मॅनेज करून हा आरोपी पळून गेल्याची चर्चा सुरु आहे. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी त्यांच्यावर कोणती कारवाई करणार ? याकडे लक्ष वेधले आहे.