तुळजापूर : मयत नामे-मुरलीधर लक्ष्मणराव श्रीवास्तव, वय 60 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीनी नगर लातुर ता. जि. लातुर हे दि.22.10.2023 रोजी 04.15 वा. सु. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी रोडने पायी चालत जात होते. दरम्यान खंडाळा शिवारातील लातुर ते तुळजापूर जाणारे एनएच 361 रोडवर खंडाळा गावाजवळील छोट्या पुलाजवळ अज्ञात वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून मुरलीधर श्रीवास्तव यांना पाठीमागून धडक दिली.
या अपघातात मुरलीधर श्रीवास्तव हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद अज्ञात वाहन चालक हा जखमीस मदत न करता आपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा नामे- राहुल मुरलीधर श्रीवास्तव, वय 27 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मीनी नगर लातुर ता. जि. लातुर, यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
धाराशिव : मयत नामे-युवराज सदाशिव काटे, वय 50 वर्षे, रा. जवळे दु. ता. जि. धाराशिव हे दि.18.12.2023 रोजी 19.00 वा. सु. जवळा दु. पाटीवर आळणी पाटी ते ढोकी कडे जाणारे रोडवरुन टमटम चालविता जात होते. दरम्यान स्विफट डिझायर गाडी क्र एमएच 46 एडी 6177 चा चालकाने त्याचे ताब्यातील कार हे भरधाव वेगात, निष्काळजीपणे चालवून युवराज काटे यांचे टमटमला पाठीमागून धडक दिली.
या अपघातात युवराज काटे हे गंभीर जखमी होवून मयत झाले. नमुद कार चालकाने सदर कार ही तेथेच ठेवून जखमीस मदत न करता आपघाताची माहिती न देता पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा चुलतभाउ नामे- सुनिल भगवानराव काटे, वय 52 वर्षे, रा. जवळे दु. ता. जि. धाराशिव, यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.वि.सं. कलम- 279, 338, 304(अ) सह 134 (अ) (ब), 184 मोवाका अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
मारहाण
येरमाळा :आरोपी नामे- 1)रामानंद बापुराव ढवळे,2) बापूराव ढवळे, दोघे रा. शेलगाव दिवाणी, ता. कळंब जि. धाराशिव, 3) सिरसट व सोबत अनोळखी इसम (पुर्ण नाव माहित नाही) दोघे रा. सकनेवाडी ता. जि. धाराशिव, यांनी दि.18.12.2023 रोजी 22.00 वा .सु. शेलगाव दिवाणी येथे फिर्यादी नामे- महेश चंद्रकांत शेळके, वय 26 वर्षे, रा. वाणेवाडी, ता. कळंब जि. धाराशिव यांना मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, लोखंडी पाईपने मारहण करुन जखमी केले. तसेच फिर्यादीचे वडील व भाउ हे भांडण सोडवण्यास आले असता नमुद आरोपींनी त्यांनाही शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी मारहाण केली. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- महेश शेळके यांनी दि.19.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं.अन्वये गुन्हा नोंदवला आहे.