कळंब – वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी १५ हजार लाचेची मागणी करून तडजोडीअंती ८हजार लाच घेताना तहसीलदार यांचा वाहन चालकास एसीबी पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला आहे.
अनिल शिवराम सुरवसे , वय 54 वर्षे, वाहन चालक, तहसिलदार कार्यालय, कळंब, जि. धाराशीव, रा.ठि. झिंगाडे प्लॅाटींग, अंबाबाई मंदीराचे बाजुला, लोहारा, धाराशीव.( वर्ग -3) असे या आरोपीचे नाव आहे. या वाहन चालकाने साहेबाच्या नावावर लाच मागितली असली तरी साहेबाची चौकशी होणार का ? याकडे लक्ष वेधले आहे.
यातील तक्रारदार हे ट्रॅक्टरने वाळु वाहतुक करतात. यातील आरोपी लोकसेवक अनिल सुरवसे, हा तहसिलदार कळंब यांचे वाहनावर वाहन चालक असुन त्याने तक्रारदार यांना वाळु वाहतुक करुन देण्यासाठी व वाळुचे ट्रॅक्टरवर कोणतीही कारवाई न करण्यासाठी दि. 19/12/2023 रोजी पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे महिन्याला हप्ता म्हणुन 15,000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती 8000/-रु. लाच रक्कमेची मागणी केली व आज दि. 20/12/2023 रोजी 8000/- रु लाच रक्कम तक्रारदार यांचेकडुन नमुद आलोसे याने पंचांसमक्ष स्विकारल्याने त्यास ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन कळंब , ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
हा सापळा पोलीस उपाधीक्षक सिद्धाराम म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अमलदार दिनकर उगलमुगले, सचिन शेवाळे, नागेश शेरकर, चालक दत्तात्रय करडे यांनी रचला होता.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा
कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064