तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामीनीं आई तुळजाभवानी देवीच्या सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारणाऱ्या चार महंतासह सात जणांवर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन ) सोमनाथ बबुराव माळी ( वय 40 वर्षे ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, या गैरव्यवहार प्रकरणी पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 519/2023 कलम 420,406,409,381,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चोरीचा तपास करण्यासाठी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे.
आरोपी नामे- 1)महंत हमरोजी बुवा गुरु चिलोजी बुवा, 2)महंत चिलोजी बुवा गुरु हमरोजी बुवा, 3) महंत वाकाजी बुवा गरु तुकोजी बुवा, 4) महंत बजाजी बुवा गुरु वाकोजी बुवा, 5) अंबादास भोसले-सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक (मयत), 6) दर्जेवारी रजिस्टर नुसार सेवेदारी पंलगे, सोबत अनोळखी इतर सर्व रा. तुळजापूर जि. धाराशिव यांनी दि. 01.01.1963 रोजी 00.00 ते दि. 19.12.2023 रोजी 22.00 वा. सु. श्री. तुळजाभवानी मंदीरातील नमुद वर्णनाचे श्री. देवीजींचे मैल्यवान दागीने, अलंकार, वस्तु, सोने, चांदीच्या वस्तु नमुद केलेल्या कालावधीत ज्या व्यक्तींकडे त्यांचा ताबा व जबाबदारी होती त्यांनी श्री. तुळजाभवानी देवीजींचे मौल्यवान अलंकार व वस्तु, सोने,चांदीच्या, वस्तु,त्यांच्याकडे विश्वासाने ताब्यात दिलेल्या असताना त्यांनी त्या विश्वासाचा भंग करुन सदर वस्तुंचा स्वत:चे फायद्यासाठी अपहार केलेला आहे, त्या चोरुन नेलेल्या आहे व त्यांचा वापर स्वत:ची वस्तु म्हणून करुन श्री तुळजाभवानी मंदीर संस्थान व श्री देवीजींचे भाविकांची दिशाभुल करीत सदरची मालमत्ता लुबाडुन फसवणुक केलेली आहे.
तहसिलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन ) सोमनाथ बबुराव माळी ( वय 40 वर्षे ) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून, या गैरव्यवहार प्रकरणी पोलीस ठाणे तुळजापूर येथे गुरनं 519/2023 कलम 420,406,409,381,34 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे आदेशाने विषेश तपास पथक स्थापन करण्यात आले असुन सदर गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथक प्रमुख उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख हे सोबत तुळजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चास्कर, महिला पोलीस उप निरीक्षक जाधव हे करत आहेत.