• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, September 16, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव : वेश्या व्यवसाय प्रकरणी नितीन शेरखाने गजाआड

admin by admin
December 24, 2023
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : वेश्या व्यवसाय प्रकरणी नितीन शेरखाने गजाआड
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव : तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज मध्ये मागील अनेक दिवसांपासून वेश्या व्यवसाय सुरु होता. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या आदेशानंतर दि. २१ डिसेंबर रोजी पोलिसांनी या लॉजवर छापा मारला असता, चार महिलांसह काही ग्राहक मिळून आले होते. याप्रकरणी लॉजमालक नितीन शेरखाने यांच्यासह गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी अखेर शेरखाने याच्या मुसक्या आवळल्या आहेत.

नितीन शेरखाने हा शिवसेना ( उबाठा ) सेनेचा पदाधिकरी असून,  राष्ट्रीय चर्मकार महासंघाचा युवक प्रदेशाध्यक्ष आहे.त्याची पत्नी जिल्हा परिषद सदस्य होत्या.  त्यांच्यावर वेश्या व्यवसाय प्रकरणी गुन्हा दाखल होऊन अटक झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज येथे मागील अनेक दिवसापासून राजरोस वेश्या सुरु होता. धाराशिव ग्रामीण पोलीस  आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना दरमहा हप्ता सुरु होता. हा प्रकार पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या कानावर जाताच, त्यांनी एक पथक नेमून सदर लॉजवर छापा मारला असता चार महिला सापडल्या. याप्रकरणी लॉजमलक नितीन शेरखाने यांच्यासह तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

धाराशिव शहरात तुळजापूर ते धाराशिव नॅशनल हायवेच्या रस्त्यालगत असलेल्या ‘निसर्ग गारवा लॉज’ येथे लॉज चालक- व्यवस्थापक हॉटेलमध्ये काही महिलांद्वारे वेश्या व्यवसाय करवुन घेत आहेत. यावर पोलीस पथकाने एका बनावट ग्राहकास तेथे पाठवून बातमीची खात्री करुन नमूद लॉजवर दि. 21.12.2023 रोजी 16.05 वा. सु. छापा टाकला असता लॉज मध्ये चार महिला (नाव- गाव गोपनीय) आढळुन आल्याने महिला पोलीसांमार्फत त्यांची विचारपुस केली असता हॉटेल चालक दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव,दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, हे दोघेजण नमुद लॉजचे मालक 1)नितीन रोहीदास शेरखाने रा. धाराशिव यांचे सांगण्यावरुन त्या महिलांना वाणिज्यिक प्रयोजनाकरीता आश्रय देउन त्यांना लैंगीक स्वैराचाराकरीता परावृत्त करत होते व नमुद तिघेजण त्यावर स्वत:ची उपजिवीका करत आहेत असे समजले.

यावरुन पथकाने लॉज मॅनेजर नामे- 1) दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे, रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल-2) बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांना ताब्यात घेउन त्यांच्या ताब्यातील मोबाईल फोन, नोंदीचे रजिस्टर, ॲटोरिक्षा क्र एमएच 09 जे 8134, रोख रक्कम 16,130 व निरोधची पाकीटे असा एकुण 71,130 ₹ माल हस्तगत केला. पोलीसांनी संबंधीत वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवरील त्या महिलांची सुटका करुन लॉजमालक नितीन रेाहीदास शेरखाने रा. धाराशिव, लॉज मॅनेजर दिलीप रामदास आडसुळे, वय 63 वर्षे,रा. करंजकर हॉस्पीटल जवळ धाराशिव, दलाल- बालाजी चंद्रकांत गवळी, वय 29 वर्षे, रा. लहुजी नगर नागनाथ रोड धाराशिव, यांचेविरुध्द गुरनं 352/2023 भा.दं.वि. सं. कलम- 370, 370 (अ) (2), 34 सह मानवी अनैतिक व्यवसाय प्रतिबंधक अधिनियम कलम- 3, 4, 5 अन्वये धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात दि. 21.12.2023 रोजी गुन्हा नोंदवला आहे.गुन्हा दाखल झाल्यानंतर नितीन शेरखाने फरार झाला होता. पोलिसांनी रविवारी पहाटे त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक केली आहे.

धाराशिव शहरात आणखी काही लॉजवर राजरोस वेश्या व्यवसाय सुरू आहे. शहर आणि आनंदनगर पोलीस, धाराशिव ग्रामीण पोलीस तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस हप्ता घेऊन मूग गिळून गप्प आहेत.हप्ता नाही मिळाला की, छापा मारला जातो नाही तर ‘तेरी भी चूप , मेरी भी चूप असा प्रकार सुरु आहे.

Previous Post

वागदरी आणि शिरढोण येथे हाणामारी , दोन जखमी

Next Post

धाराशिवची ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी : दरोडा पडला की पाडला ?

Next Post
धाराशिवची ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी : दरोडा पडला की पाडला ?

धाराशिवची ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटी : दरोडा पडला की पाडला ?

ताज्या बातम्या

वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास

September 16, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद

September 16, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली

September 16, 2026

Recent Posts

  • दिंडेगाव : कुटुंब शेतात जाताच चोरट्यांनी घराचा पत्रा उचकटला; कपाटातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह दीड लाखांचा ऐवज लंपास
  • जळकोट : घरासमोरील कंपाऊंडच्या आडोशाला गांजाची विक्री; ७८ वर्षीय वृद्धाकडून ४२ हजारांचा गांजा जप्त, नळदुर्ग पोलिसांत गुन्हा दाखल
  • धाराशिव : गणेश विसर्जन मिरवणुकीत कर्णकर्कश डॉल्बी अन् मर्यादेपेक्षा जास्त उंचीची आरास; पोलीस अधीक्षकांच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल
  • धाराशिव : जिल्हाधिकारी निवासस्थानाजवळील सावरकर चौकात लोखंडी कोयता बाळगणारा तरुण जेरबंद
  • तलमोड चेकपोस्टवर उमरगा पोलिसांची मोठी कारवाई; स्विफ्ट डिझायरमधून होणारी अवैध गुटख्याची वाहतूक पकडली
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!