धाराशिव – धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चुकांचे व्यवहार करणाऱ्या ‘ब्लंडर बँके’चा ‘बिझनेस’ आता धोक्यात आला आहे. बँकेच्या प्रत्येक ‘चुकीच्या डिपॉझिट’वर ठाकरे गट आता थेट ‘पेनल्टी’ लावू लागला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात सुरू असलेल्या मोहिमेला शिवसेना शहर प्रमुख सोमनाथ गुरव यांनी एका नव्या सोशल मीडिया पोस्टने इतके सणसणीत उत्तर दिले आहे की, ‘ब्लंडर बँके’चे ‘शटर’ तात्पुरते डाऊन होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचा नवा ‘पंचनामा’
सोमनाथ गुरव यांनी आपल्या नव्या पोस्टमधून ‘ब्लंडर बँके’च्या मालकी हक्कावर आणि कार्यपद्धतीवरच थेट हल्ला चढवला आहे. त्यांची पोस्ट म्हणते:
“गंजुट्या मालकाचे आदेश, अन गुलामांच्या पोस्ट…
तिन्ही पिढयांच्या कारनाम्याचे … उपलब्ध आहेत .. !”
या दोन ओळींनी धाराशिवच्या राजकारणात अक्षरशः ‘बॉम्ब’ टाकला आहे.
या इशाऱ्याचे अर्थ:
- ‘गंजुट्या मालक’ आणि ‘गुलाम’: यातून ‘ब्लंडर बँके’च्या म्होरक्यांना (शक्यतो पाटील पिता-पुत्र) ‘गंजलेले’ आणि कालबाह्य ठरवण्यात आले आहे. तर बँकेसाठी पोस्ट करणाऱ्या कार्यकर्त्यांना केवळ आदेशाचे पालन करणारे ‘गुलाम’ संबोधून त्यांच्या कृतीची खिल्ली उडवली आहे.
- ‘तीन पिढ्यांचे कारनामे’: हा यातील सर्वात मोठा आणि गंभीर इशारा आहे. हा वाद आता केवळ मल्हार पाटील किंवा राणा पाटील यांच्यापुरता मर्यादित नसून, त्यांच्या संपूर्ण घराण्याच्या राजकीय इतिहासाला हात घालण्याची ही थेट धमकी आहे. ‘तुमचे कारनामे आमच्याकडे तयार आहेत,’ असे सांगून ठाकरे गटाने आता बचावात्मक नाही, तर आक्रमक पवित्रा घेतला आहे.
राजकीय ‘ताळेबंद’ आता बरोबरीत?
‘आम्हाला कळालं’ म्हणत भाजपने जी सुरुवात केली होती, त्याला ठाकरे गटाने ‘तुमच्या तीन पिढ्यांचं आम्हाला माहीत आहे’ असे उत्तर देऊन खेळ बरोबरीत आणला आहे. ‘ब्लंडर बँके’ने एक छोटीशी ‘चूक’ केली, पण त्यावर ठाकरे गटाने थेट ‘अकाउंट फ्रिज’ करण्याचीच नोटीस बजावली आहे.
थोडक्यात काय तर…
‘ब्लंडर बँके’च्या ‘चेअरमन’ पदासाठी आता ‘गंजुट्या मालक’ हा नवीन शब्दप्रयोग आला आहे. आता या ‘गंजलेल्या’ नेतृत्त्वाकडून बँकेत अजून चुका ‘डिपॉझिट’ केल्या जातात, की ‘तीन पिढ्यांच्या ऑडिट’च्या भीतीने बँकेला तात्पुरते ‘लॉक’ लावले जाते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. धाराशिवचे मतदार या राजकीय ‘बँक बॅटल’चे साक्षीदार बनले आहेत.