• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, April 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

जिल्ह्यात चोऱ्यांचे सत्र सुरूच; कळंबमध्ये दुकान फोडून तर धाराशिवमध्ये शेतातून मुद्देमाल लंपास

admin by admin
September 14, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
धाराशिव : म्हशीचे वासरू शेतात घुसल्याच्या वादातून दोन गटांत तुंबळ मारामारी; परस्परविरोधी गुन्हे दाखल
0
SHARES
163
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव  जिल्ह्यात चोरांचा सुळसुळाट झाला असून, कळंब आणि धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन मोठ्या चोऱ्यांच्या घटना घडल्या आहेत. एका घटनेत सिमेंट विट उद्योगाचे दुकान फोडून ४४ हजार रुपयांचा माल चोरट्यांनी लंपास केला, तर दुसऱ्या घटनेत शेतकऱ्याची मोटारसायकल आणि शेतीउपयोगी साहित्य असा एकूण ३८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कळंबमध्ये दुकानातून ४४ हजारांची चोरी

कळंब येथील बाबा नगर रोड परिसरात असलेल्या ‘भराडे सिमेंट विट उद्योग’ या दुकानात चोरीची घटना घडली आहे. फिर्यादी दत्तात्रय विठ्ठल भराडे (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक १२ सप्टेंबर रोजी रात्री ८ ते १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८:३० च्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरट्यांनी दुकानातून ट्रॅक्टरची हायड्रोलिक असेंब्ली, ५० फूट वायर आणि सिमेंट बनवण्याच्या २५० लोखंडी प्लेट्स असा एकूण ४४,००० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी दत्तात्रय भराडे यांनी १३ सप्टेंबर रोजी कळंब पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

धाराशिव ग्रामीण भागात शेतातून ३८ हजारांचा ऐवज लंपास

दुसरी घटना धाराशिव तालुक्यातील पवारवाडी शिवारात घडली. येथील शेतकरी विशाल सुनील मुंढे (वय ३१) यांच्या शेतातून मोटारसायकलसह शेतीचे साहित्य चोरीला गेले आहे. दिनांक ६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७:३० ते ७ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या शेतातून एमएच २५ ए.वाय. ३५८७ क्रमांकाची २५,००० रुपये किमतीची हिरो होंडा मोटारसायकल, पाणबुडी, स्प्रिंकलरच्या चार चिमण्या आणि १०० मीटर केबल असा एकूण ३८,००० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी विशाल मुंढे यांनी १३ सप्टेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस चोरांचा शोध घेत आहेत.

Previous Post

धाराशिव: चारित्र्याच्या संशयावरून महिलेस मारहाण; पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

भूममध्ये गोवंशियांची निर्दयी वाहतूक उघड; ३४ वासरांचा गुदमरून मृत्यू, ४.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Next Post
भूम : कत्तलीसाठी गायींची बेकायदेशीर वाहतूक; ४.७५ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांवर गुन्हा दाखल

भूममध्ये गोवंशियांची निर्दयी वाहतूक उघड; ३४ वासरांचा गुदमरून मृत्यू, ४.६ लाखांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्या

पवनराजे निंबाळकर हत्याकांड: युक्तिवाद संपला, आता निकालाची प्रतीक्षा; २४ मार्चला तारीख ठरणार

कै. पवनराजे निंबाळकर हत्याकांड: तब्बल २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर १४ मे रोजी लागणार निकाल; संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष!

April 20, 2026
महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

महावितरणच्या कारभाराविरोधात ठाकरे गटाचा संताप; धाराशिवमध्ये तीव्र ‘रास्ता रोको’

April 20, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कपडे खरेदीचा बहाणा करून दुकानातून १ लाख ९० हजारांची रोकड पळवली

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

महाळंगीत किरकोळ वादातून तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला; तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
अपघातात जखमी अनोळखी वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू; ओळख पटवण्याचे पोलिसांचे आवाहन

१५ लाखांची खंडणी मागत कंपनीच्या कर्मचाऱ्याला मारहाण; जिवे मारण्याची धमकी, तिघांवर गुन्हा दाखल

April 20, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group