धाराशिव: भारतीय हवामान विभाग (IMD), मुंबईने आज दुपारी जारी केलेल्या अंदाजानुसार, धाराशिव जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्याला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला असून, नागरिकांनी आणि प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, छत्रपती संभाजीनगर विभागातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे, तर धाराशिवसह जालना, परभणी, हिंगोली, लातूर आणि नांदेड या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
या सूचनेनुसार, धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असल्याने, जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले आहेत. विशेषतः नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, परिस्थितीनुसार गरज भासल्यास नदीकिनारी राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात यावे.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या संबंधित कार्यालयास देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी घाबरून न जाता, प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा; नदीकाठच्या नागरिकांना स्थलांतराचे आवाहन
जिल्ह्यात अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. विशेषतः नदीकाठच्या नागरिकांनी तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे तातडीचे आवाहन करण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी प्रशासनाच्या संपर्कात रहावे आणि त्यांच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही प्रशासनातर्फे कळवण्यात आले आहे.
कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची माहिती तात्काळ जिल्हा प्रशासनाच्या संबंधित कार्यालयास देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
आपत्कालीन परिस्थितीत येथे संपर्क साधा
प्रशासनाने नागरिकांच्या मदतीसाठी प्रमुख अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक जारी केले आहेत. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत खालील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा:
- श्रीमती शोभा जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी – 9423341317
- श्री. रेयैवह डोंगरे, उपविभागीय अधिकारी, भूम – 9566096691
- श्री. निलेश काकडे, तहसिलदार, परंडा – 8208513656
- श्री. जयवंत पाटील, तहसीलदार, भूम – 9823722274
- श्री. विजय बाडकर, नायब तहसीलदार, परंडा – 9359209119
- श्री. प्रवीण जाधव, नायब तहसीलदार, भूम – 8208791799