• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 15, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव पालिका गैरव्यवहार : येलगट्टे , बोर्डे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला

admin by admin
December 28, 2023
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिव पालिका गैरव्यवहार : येलगट्टे , बोर्डे यांचा कारागृहातील मुक्काम वाढला
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी लेखापाल सूरज बोर्डे यांचा जामीन अर्ज अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी नामंजूर केला आहे. बोर्डे यांचा जामीन अर्ज नामंजूर होताच, निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या वकिलांनी अर्ज स्वतःहून परत घेतला आहे. त्यामुळे बोर्डे आणि येलगट्टे यांचा जिल्हा कारागृहातील मुक्काम वाढला आहे.

धाराशिव नगर पालिकेतील कथित २७ कोटीच्या गैरव्यवहार आणि अनियमितता प्रकरणी आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये १४ ऑगस्ट २०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी निलंबित मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांना तातडीने अटक झाली होती तर लेखापाल सूरज बोर्डे तीन महिने फरार होते. या प्रकरणाचा तपास आनंदनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्याकडून काढून पोलीस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांच्याकडे देण्यात आल्यानंतर बोर्डे यांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्यानंतर बोर्डे आणि येलगट्टे यांचा जामीन अर्ज प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी फेटाळून लावल्यानंतर या दोघांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली होती.

बोर्डे आणि येलगट्टे यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांच्यासमोर झाली, यावेळी आरोपीचे वकील ऍड. विशाल साखरे यांनी जोरदार युक्तिवाद केला पण आरोपी येलगट्टे यांच्यावर एकूण आठ तर बोर्डे यांच्यावर दोन गुन्हे दाखल असल्याने आणि २७ कोटींचा आकडा मोठा असल्याने याप्रकरणी जामीन देण्यास अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी नकार दिला. बोर्डे यांचा जामीन अर्ज नामंजूर होताच, येलगट्टे यांचा अर्ज विड्रॉल करण्यात आला. त्यावर अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही.जी. मोहिते यांनी नापसंती व्यक्त केली.

काय आहे प्रकरण ?

आरोपी नामे- हरिकल्याण जनार्धन येलगट्टे, तत्कालीन मुख्याधिकारी, नगर परिषद उस्मानाबाद 2) सुरज संपत बोर्डे तत्कालीन लेखापाल, 3) प्रशांत विक्रम पवार तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक सर्व रा. उस्मानाबाद यांनी दि.06.07.2020 ते दि.21.11.2022 पावेतो नगर परिषद उस्मानाबाद येथे एकुण 1088 प्रमाणके शासकीय अभिलेख आहे. हे माहित असताना व ते लेखाविभागात जतन करुन ठेवणे बंधनकारक असताना ती ठेवली नाहीत आणिक विविध विकास योजना व इतर आनुषंगीक खर्चाबाबतचे एकुण 514 प्रमाणके ज्याची एकुण 27,38,78,100 ₹ रक्कमेचा अपहार करुन तो दडपण्याच्या उद्देशाने प्रमाणके जाणिवपुर्वक लेखाविभागात ठेवले नाहीत अशा मजकुराच्या फिर्यादी नामे- अशोक कलेश्वर फरताडे, वय 31 वर्षे, धंदा लेखापाल नगर परिषद उस्मानाबाद रा.मस्सा खंडेश्वरी ता. कळंब जि. उसृमानाबाद हा.मु. समर्थ नगर उस्मानाबाद ता. जि. उस्मानाबाद यांनी दि.14.08.2023 रोजी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो ठाणे येथे भा. दं. वि. सं. कलम- 420, 409, 34, 201 सह महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख अधि कलम 9 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

पवार फरार

या प्रकरणातील आणखी एक आरोपी प्रशांत विक्रम पवार ( तत्कालीन अंतर्गत लेखापरिक्षक ) गेल्या साडेचार महिन्यापासून फरार आहे. पोलिसाना तो चकवा देत आहे. परंतु त्यास अद्याप फरार घोषित का करण्यात आले नाही ? याबाबत उलट – सुलट चर्चा सुरु आहे.

ही प्रमाणके आली कुठून ?

धाराशिव नगर पालिकेतील २७ कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणी 514 प्रमाणके गायब होती. लेखापाल सूरज बोर्डे यांना पोलिसांनी अटक करून, पोलीस कस्टडी घेतली असता त्यांनी २४२ प्रमाणके पोलिसांच्या हवाली केली. चौकशी समितीने आठ स्मरणपत्र देऊनही त्यांना ही प्रमाणके का दाखवण्यात आली नाहीत ? नंतर आणून ठेवली असल्यास त्याची कस्टडी कुणाकडे होती, असे एक ना अनेक प्रश्न आहेत.

गैरव्यवहार अंगलट आल्यानंतर नवीन प्रमाणके तयार करण्यात आली आहेत तसेच त्यावर मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांच्या सह्या नाहीत, अशी माहिती आहे. त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी आ. सुरेश धस यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली आहे.

एसआयटी स्थापन होणार

धाराशिव नगर पालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी आमदार सुरेश धस यांनी विधान परिषदेत लक्षवेधी मांडली असता, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशीसाठी एसआयटी स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा केली होती. धाराशिवचे माजी जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या अध्यक्षतेखाली एसआयटी नियुक्त करण्यात यावी, अशी आ. सुरेश धस यांची मागणी आहे.

तीन सक्षम अधिकाऱ्यांची नियुक्ती

धाराशिव नगर पालिकेतील कथित गैरव्यवहार आणि भ्रष्ट्राचार प्रकरणी तांत्रिक आणि लेखा विषयक बाबी तपासण्यासाठी डीवायएसपी स्वप्नील राठोड यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे पत्र देऊन तज्ञ अधिकाऱ्याची नेमणूक करण्याची विनंती केली असता, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी पोलिसाना मदत करण्यासाठी तीन अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. त्यात सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता अकेले , शाखा अभियंता अमर भोजने, जिल्हा परिषदेचे लेखाधिकारी चंद्रशेखर काजळे यांचा समावेश आहे.

Previous Post

परजिल्ह्यातून धाराशिव जिल्ह्यात दरोडा टाकण्यासाठी आलेले आठ दरोडेखोर जेरबंद

Next Post

भूम आणि उमरगा येथे हाणामारी, दोन जखमी

Next Post
तुळजापुरात तीन तर बेंबळीत दोन ठिकाणी हाणामारी

भूम आणि उमरगा येथे हाणामारी, दोन जखमी

ताज्या बातम्या

धाराशिवमधील रस्त्यांसाठी १४० कोटींची फेरनिविदा; दिवाळीनंतर कामांना सुरुवात, पण निवडणुकीच्या आचारसंहितेचं काय?

पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?

September 15, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

September 14, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी

September 14, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद

September 13, 2026

Recent Posts

  • पालकमंत्री की केवळ ‘झेंडा मंत्री’?
  • तामलवाडी : १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचे हातपाय बांधून शेतात लैंगिक अत्याचार
  • शिंगोली : “शाळेत शिवीगाळ का केली?” विचारल्यावरून तरुणाला रस्त्यावर आपटून बेदम मारहाण; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल
  • माणकेश्वर : बेकायदेशीर बैलगाडा शर्यतीवरून दोन गटांत तुंबळ हाणामारी; दगड-काठ्यांच्या हल्ल्यात ४ जण जखमी
  • आळणी येथे दोन गटांत तुंबळ हाणामारी; कोयता, कत्ती व पिस्तुलाचा वापर, तीन वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!