भुम :आरोपी नामे- 1)रामकृष्ण सोमनाथ सानप, रा. रामेश्वर ता. भुम , 2) भैया जानकर, रा. सुकटा ता. भुम , 3) रुपेश साळुंखे, रा. पाथरुड ता. भुम , 4) नितीन बिक्कड, इतर अनोळखी सात ते आठ इसम रा. फक्राबाद ता. वाशी जि. धाराशिव यांनी दि.26.12.2023 रोजी 17.30 वा .सु. वसंत नगर रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव येथे फिर्यादी नामे-अभिजीत भरत दराडे, वय 31 वर्षे, रा. रामेश्वर ता. भुम जि. धाराशिव, व त्यांचे भाउ अविनाश, आई लता, भावजई प्रियंका यांना नमुद आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून मागील भांडणाचे कारणावरुन शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, कोयता व कुह्राडीचा दाड्यांने मारहाण करुन जखमी केले. व जिवे ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- अभिजीत दराडे यांनी दि.27.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भुम पो. ठाणे येथे कलम 324, 323, 143, 147, 148, 149, 504, 506 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
उमरगा :आरोपी नामे- 1) बालाजी खराटे, रा. कुभांरी पट्टी उमरगा ता. उमरगा जि. , 2) यश शिंदे रा. पंतगे रोड, लक्ष्मण तांडा उमरगा ता. उमरगा जि. यांनी दि. 27.12.2023 रोजी 11.30 वा. सु. हुतात्मा स्मारक उमरगा येथे रोडवर फिर्यादी नामे- मुद्दसीर रज्जाक इनामदार, वय 21 वर्षे, रा. जकेकुर ता. उमरगा जि. धाराशिव हे त्यांचा चुलत भाउ अयाज शेख याला नमुद आरोपींनी मारहाण केल्याने ते विचारण्यासाठी फिर्यादी गेले असता नमुद आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करुन लाथाबुक्यांनी, फायटरने मारहाण करुन जखमी केले. व तुला पुन्हा बघुन घेवू अशी धमकी दिली. अशा मजकुराच्या फिर्यादी- मुद्दसीर इनामदार यांनी दि.27.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन उमरगा पो. ठाणे येथे कलम 324, 323, 504, 506, 34 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.