ढोकी : धाराशिव तालुक्यातील बुक्कनवाडी येथील विजयकुमार बुक्कन यांचे घराचे कुलूप चोरट्यांने सोन्या- चांदीचे दागिने लंपास केल्याने या गावात खळबळ उडाली आहे.
फिर्यादी नामे-विजयकुमार श्रीधर बुक्कन, वय 40 वर्षे, रा. बुक्कनवाडी ता. जि. धाराशिव यांचे राहाते घराचे कुलूप अज्ञात व्यक्तीने दि.27.12.2023 रोजी 00.30 ते 05.00 वा. सु. तोडून आत प्रवेश करुन घरातील 25 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व चांदीचे तोडे असा एकुण 72,000 ₹ किंमतीचा माल चोरुन नेला. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-विजयकुमार बुक्कन यांनी दि.27.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन ढोकी पो. ठाणे येथे कलम 457, 380 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.
दुचाकी पळवली
नळदुर्ग : फिर्यादी नामे-अमोल शिवाजी पांढरे, वय 38 वर्षे, रा. आष्टाकासार ता. लोहारा जि. धाराशिव यांची अंदाजे40,000₹ किंमतीची हिरो पॅशन एक्स प्रो कंपनीची मोटरसायकल क्र एमएच 25 झेड 9717 काळ्या रंगाची ही दि.23.12.2023 रोजी 14.00 ते 21.00 वा. सु. नळदुर्ग येथुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली. आशा मजकुराच्या फिर्यादी नामे-अमोल पांढरे यांनी दि.27.12.2023 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन नळदुर्ग पो. ठाणे येथे कलम 379 भा.दं.वि.सं. अन्वये गुन्हा नोंदवला आहे.