• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, July 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

नगरपालिकांचे बिगुल वाजले: थेट नगराध्यक्ष निवडीमुळे चुरस; महायुतीत ‘बेबनाव’, मविआ ‘एकसाथ’

राज्यात एकत्र, पण जिल्ह्यात वेगळी समीकरणे; धाराशिव-तुळजापूरमध्ये हाय-व्होल्टेज लढतीची शक्यता, भाजपमध्ये बंडखोरीचे सावट

admin by admin
November 4, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिवमध्ये स्वच्छता कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन
0
SHARES
859
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव जिल्ह्यातील आठ नगरपालिका आणि दोन नगर पंचायतींचा निवडणूक कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुका २ डिसेंबर रोजी होणार आहेत. मात्र, तारखा जाहीर होताच राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला असून, यंदाची निवडणूक ‘थेट नगराध्यक्ष’ पद्धतीमुळे अत्यंत चुरशीची होणार आहे.

या निवडणुकीत राज्याच्या राजकारणातील समीकरणांचा थेट परिणाम दिसणार आहे. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीमध्ये (भाजप, शिवसेना-शिंदे गट, राष्ट्रवादी-अजित पवार गट) एकी असली, तरी जिल्ह्यात मात्र त्यांच्यात अनेक ठिकाणी ‘बेबनाव’ असल्याचे चित्र आहे. त्यामुळे जागावाटपावरून युतीमध्येच संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत.

त्याउलट, महाविकास आघाडीने (शिवसेना-ठाकरे गट, काँग्रेस, राष्ट्रवादी-शरद पवार गट) मात्र जिल्ह्यात एकत्र लढण्याची तयारी दर्शवली आहे. जिल्ह्यात शिवसेना (ठाकरे गट) आणि भाजप या दोन पक्षांची ताकद मोठी असल्याने, अनेक ठिकाणी खरी लढत याच दोन पक्षांमध्ये पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

धाराशिव-तुळजापूरमध्ये प्रतिष्ठेची लढत

जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी धाराशिव आणि तुळजापूर येथील लढती सर्वाधिक चुरशीच्या आणि प्रतिष्ठेच्या ठरणार आहेत. नगराध्यक्षपदाची थेट निवडणूक असल्याने अनेकजण ‘गुडघ्याला बाशिंग बांधून’ उमेदवारीसाठी तयार आहेत.

विशेषतः धाराशिव शहरात भाजपकडे इच्छुकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळाल्यास येथे सर्वात जास्त बंडखोरी होण्याची शक्यता राजकीय जाणकार वर्तवत आहेत. बंडखोरांना शांत करणे हेच भाजपसमोर मोठे आव्हान असणार आहे.


या ठिकाणी होणार निवडणुका:

  • ८ नगरपालिका: धाराशिव, तुळजापूर, उमरगा, नळदुर्ग, मुरूम, भूम, परांडा, कळंब.
  • २ नगर पंचायत: लोहारा आणि वाशी.

निवडणूक कार्यक्रम:

    • नामनिर्देशन पत्र दाखल करणे: १० नोव्हेंबर पासून
    • नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस: १७ नोव्हेंबर
    • अर्ज माघारी घेण्याची तारीख – 21 नोव्हेंबर
    • निवडणूक चिन्ह वाटप – 26 नोव्हेेबर
    • मतदान: २ डिसेंबर
    • मतमोजणी: ३ डिसेंबर
Previous Post

धाराशिव बस स्थानकात गर्दीचा फायदा घेत महिलेचे ८४ हजार रुपयांचे दागिने लंपास; आनंदनगर पोलिसांत गुन्हा दाखल

Next Post

माळकरंजा येथील ग्रामस्थ सुविधांसाठी उपोषणाला

Next Post
माळकरंजा येथील ग्रामस्थ सुविधांसाठी उपोषणाला

माळकरंजा येथील ग्रामस्थ सुविधांसाठी उपोषणाला

ताज्या बातम्या

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

नीट पेपरफुटी प्रकरणी विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ धाराशिवात कॅन्डल मार्च; आमदार कैलास पाटील यांचा सहभाग

July 22, 2026
राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

राहुल गांधी यांच्या अटकेच्या निषेधार्थ धाराशिवात काँग्रेसचे आंदोलन

July 22, 2026
धाराशिवमध्ये मोठी फसवणूक: ‘सुखमनी कंपनी’वर कोट्यवधींच्या घोटाळ्याचा आरोप, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

परंडा तालुक्यात तोतया अन्न भेसळ अधिकाऱ्यांचा कारनामा!

July 22, 2026
धाराशिव जिल्ह्यात लैंगिक अत्याचाराच्या तीन घटना उघडकीस; लोहारा, नळदुर्ग, बेंबळी येथे गुन्हे दाखल

धाराशिव जिल्ह्यात धक्कादायक बालविवाह प्रकरण उघडकीस!

July 22, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

लोहारा तालुक्यातील तावशीगड येथे जुन्या वादातून जीवघेणा हल्ला!

July 22, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!