• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Wednesday, March 4, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिव महायुतीत मोठी ठिणगी; परंडा नगरपरिषदेसाठी आ. तानाजी सावंतांची ‘एकला चलो’ ची घोषणा

मंत्रीपद गेल्यापासून नाराजी कायम

admin by admin
November 8, 2025
in धाराशिव जिल्हा
Reading Time: 2 mins read
मुंबईचे ‘फ्लाइंग’ पालकमंत्री अन् धाराशिवचे ‘अबोल’ आमदार तानाजी सावंत !
0
SHARES
363
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: आगामी परंडा नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर धाराशिव जिल्ह्यातील महायुतीमध्ये उभी फूट पडल्याचे चित्र आहे. शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी मंत्री आमदार तानाजी सावंत यांनी परंडा नगरपरिषदेसाठी ‘एकला चलो’ ची भूमिका जाहीर केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

एकीकडे महायुती एकसंध असल्याचा दावा केला जात असतानाच सावंत यांनी घेतलेली ही वेगळी भूमिका थेट भाजप आमदार राणा पाटील यांच्यासोबतच्या वादातून पुढे आल्याची चर्चा आहे.

विशेष म्हणजे, एकीकडे भाजप आमदार राणा पाटील हे मुंबईत जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत बैठक घेऊन महायुती एकसंध असल्याचा दावा करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्याच पक्षाचे (शिवसेना शिंदे गट) नेते तानाजी सावंत यांनी परंड्यासाठी स्वबळाचा नारा दिल्याने मोठा विरोधाभास निर्माण झाला आहे. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे देखील शिवसेना शिंदे गटाचेच नेते आहेत.

सूत्रांच्या माहितीनुसार, मंत्रीपद गेल्यापासून आमदार तानाजी सावंत हे नाराज आहेत. ही नाराजी त्यांनी वेळोवेळी व्यक्त केली आहे. गेल्या तीन जिल्हा नियोजन समितीच्या (DPC) बैठकांना त्यांनी लावलेली अनुपस्थिती हीदेखील त्यांच्या नाराजीचीच परिणती मानली जाते. हाच असंतोष आता परंडा नगरपरिषदेच्या निमित्ताने उफाळून आला आहे.

सावंत यांच्या या ‘एकला चलो’ च्या घोषणेमुळे परंडा नगरपरिषदेत महायुतीचे अधिकृत गणित बिघडण्याची शक्यता आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या मित्रपक्षांमधील हा उघड संघर्ष महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Dharashiv Live (@dharashiv.live.news)

Previous Post

महायुतीतच ‘लबाड लांडगा’? राष्ट्रवादीचे प्रवक्ते ॲड. विशाल साखरे यांचा रोख कुणावर?

Next Post

२०२२ ला घडलं, आताही घडू शकतं!’; आ. तानाजी सावंतांचा सरकारलाच थेट इशारा

Next Post
आगामी विधानसभा निवडणुकीत तानाजी सावंत यांना मोठ्या आव्हानांचा सामना

२०२२ ला घडलं, आताही घडू शकतं!'; आ. तानाजी सावंतांचा सरकारलाच थेट इशारा

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group