• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, September 22, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

लोहारा पोलीस ठाण्यातील प्रभारी अधिकाऱ्यासह चौघे लाचलुचपतच्या जाळ्यात; २ लाखांची लाच स्वीकारताना रंगेहाथ

मित्रावरील गुन्ह्यात सह-आरोपी न करण्यासाठी मागितली होती लाच; १० तोळ्यांचे सोन्याचे कडे व ४ लाख रुपये घेऊनही होती आणखी पैशांची मागणी

admin by admin
November 13, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव लाइव्हचा दणका : गुटखा प्रकरणी पाच पोलिसांची मुख्यालयात उचलबांगडी
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव – मित्राविरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यामध्ये सह-आरोपी न करण्याच्या मोबदल्यात एका शेतकऱ्याकडून तब्बल ५ लाख रुपयांची लाच मागून, १० तोळ्यांचे सोन्याचे कडे आणि ४ लाख रुपये उकळल्यानंतरही, आणखी २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना लोहारा पोलीस ठाण्यातील प्रभारी सहायक पोलीस निरीक्षकासह चौघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले.

ही धडक कारवाई मंगळवारी (दि. ११) सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास लोहारा तालुक्यातील भातांगळी येथे तक्रारदाराच्या शेतात करण्यात आली. या घटनेमुळे धाराशिव पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.

याप्रकरणी लोहारा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भीमराज कुकलारे (वय ४३), पोलीस शिपाई आकाश मधुकर भोसले (वय ३२), पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे (वय ३४) आणि सहायक फौजदार निवृत्ती बळीराम बोळके (वय ५७) या चौघांना एसीबीने ताब्यात घेतले आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

पुणे एसीबीच्या पथकाने दिलेल्या माहितीनुसार, ३२ वर्षीय शेतकरी तक्रारदाराने दि. ६ नोव्हेंबर रोजी लेखी तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या मित्राविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याच गुन्ह्यात तक्रारदाराला सह-आरोपी न करण्यासाठी वरील चौघा लोकसेवकांनी त्याच्याकडे ५ लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.

तक्रारदाराकडे त्यावेळी पैसे नसल्याने त्याने स्वतःचे १० तोळे वजनाचे सोन्याचे कडे काढून दिले, जे या आरोपींनी ठेवून घेतले. त्यानंतरही आरोपींनी तक्रारदाराच्या भावाकडे जाऊन त्याच्याकडून परस्पर ४ लाख रुपये घेतले. एवढ्यावरच न थांबता, आरोपींनी तक्रारदाराकडे आणखी पैशांची मागणी सुरूच ठेवली.

असा रचला सापळा

आरोपींनी ४ लाख रुपये आणि १० तोळ्यांचे कडे घेतल्यानंतरही, एपीआय कुकलारे यांनी तक्रारदाराकडे आणखी २ लाख रुपयांची लाच मागणी केली आणि ती रक्कम पोलीस नाईक तिघाडे किंवा पोलीस शिपाई भोसले यांच्याकडे देण्यास सांगितले.

या सततच्या त्रासाला कंटाळून तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली. एसीबीने या तक्रारीची ६, ७ आणि १० नोव्हेंबर रोजी पडताळणी केली. यात पैसे आणि सोन्याचे कडे घेतल्याचे निष्पन्न झाले.

त्यानुसार, मंगळवारी (दि. ११) सायंकाळी भातांगळी येथील तक्रारदाराच्या शेतात सापळा लावण्यात आला. यावेळी, एपीआय कुकलारे यांच्या सांगण्यावरून पोलीस नाईक अर्जुन शिवाजी तिघाडे याने तक्रारदाराकडून २ लाख रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने त्याला रंगेहाथ पकडले.

चौघांवर गुन्हा दाखल, पथके घरझडतीसाठी रवाना

या कारवाईनंतर चौघाही आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी तिघाडे याच्या अंगझडतीत लाचेची रक्कम २ लाख रुपये आणि एक मोबाईल फोन सापडला. तर, एपीआय कुकलारे यांच्या अंगझडतीत रोख २,४३८ रुपये, भोसले याच्याकडे २,३०० रुपये आणि बोळके याच्याकडे ६०० रुपये रोख आणि सर्वांचे मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

आरोपींविरुद्ध लोहारा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ च्या कलमांनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. तसेच, आरोपींच्या घराची झडती घेण्यासाठी एसीबीची पथके रवाना करण्यात आली आहेत.

ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक दयानंद गावडे यांच्या पर्यवेक्षणाखाली, सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले आणि पुणे येथील पोलीस निरीक्षक प्रवीण निंबाळकर यांच्या पथकाने केली.

Previous Post

“महायुतीची ‘महा’सर्कस: मुंबईत ‘फेविकॉल’चा दावा, परंड्यात ‘एकला चलो’चा कावा!”

Next Post

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपींच्या भाजप प्रवेशावरून रान पेटले; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार पाटील वादाच्या भोवऱ्यात

Next Post
तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपींच्या भाजप प्रवेशावरून रान पेटले; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार पाटील वादाच्या भोवऱ्यात

तुळजापूर ड्रग्ज प्रकरण: आरोपींच्या भाजप प्रवेशावरून रान पेटले; सुप्रिया सुळेंचे थेट मुख्यमंत्र्यांना पत्र, आमदार पाटील वादाच्या भोवऱ्यात

ताज्या बातम्या

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली

September 22, 2026
देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद

September 22, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!

September 21, 2026
शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर

September 21, 2026
आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!

September 20, 2026

Recent Posts

  • धाराशिवमध्ये वाद पेटला! ZP अध्यक्षांच्या हट्टापायी उभारलेली ‘ती’ वादग्रस्त भिंत ठाकरे सेनेने पाडली
  • देशी बनावटीचे पिस्तूल व जिवंत काडतुसांसह दोन अट्टल गुन्हेगार जेरबंद
  • उद्घाटनाचा नारळ फुटला, पाणी मात्र गायब; दानवेंनी विचारताच ‘राणा दादां’ना झोंबली मिरची!
  • शिवसेना (उबाठा) आक्रमक: अंबादास दानवेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक घालत भाजपच्या ‘जोडे मारो’ आंदोलनाला चोख प्रत्युत्तर
  • आडातच नाही पाणी, तर पोहऱ्यात कुठून येणार? नळदुर्गला १० दिवसाआड पाणी अन् साहेबांचे ‘जलपूजनाचे’ नाटक!
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!