• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

प्रेम प्रकरणातून तरुणाला येडशी घाटात बेल्ट आणि लाकडाने बेदम मारहाण; लातूरच्या ५ जणांवर गुन्हा दाखल

admin by admin
November 29, 2025
in क्राईम
Reading Time: 1 min read
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार
0
SHARES
3.5k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: प्रेम प्रकरणाच्या कारणावरून एका २५ वर्षीय तरुणाला लाकूड आणि बेल्टने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना येडशी घाटात घडली आहे. याप्रकरणी धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात लातूर येथील ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशाल दीपक गायकवाड (वय २५, रा. बारा नं पाटी, शाम नगर, जि. लातूर) असे मारहाण झालेल्या फिर्यादी तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १८ नोव्हेंबर २०२५ रोजी रात्री १ वाजण्याच्या सुमारास येडशी घाटात घडली. फिर्यादी विशाल गायकवाड आणि आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी आहेत. प्रेम प्रकरणाच्या कारणावरून आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमवून विशाल यांना गाठले. यावेळी त्यांना शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, तसेच लाकूड आणि बेल्टने बेदम मारहाण करून जखमी केले. तसेच यावेळी आरोपींनी विशाल यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

याप्रकरणी विशाल गायकवाड यांनी २८ नोव्हेंबर २०२५ रोजी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात  १. धिरज गायकवाड , २. परशुराम गायकवाड , ३. हणमंत ईटकर , ४. सुरज ईटकर , ५. गणेश गायकवाड (सर्व रा. बारा नं पाटी, शाम नगर, जि. लातूर) या पाचही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), १८९(२), १९० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

माळेगावात तरुणाला हेल्मेट आणि काठीने बेदम मारहाण; लातूरच्या दोघांवर लोहारा पोलिसांत गुन्हा

लोहारा: किरकोळ कारणावरून तरुणाला काठी आणि हेल्मेटने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना लोहारा तालुक्यातील माळेगाव येथे घडली आहे. याप्रकरणी लातूर जिल्ह्यातील दोघांवर लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुकेश बालाजी भोकरे (वय ३४, रा. माळेगाव, ता. लोहारा) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २५ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास माळेगाव येथे घडली. फिर्यादी मुकेश भोकरे यांना आरोपींनी शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी मारहाण केली. इतकेच नव्हे तर काठी आणि डोक्यातील हेल्मेटने मारून त्यांना गंभीर जखमी केले. यावेळी आरोपींनी भोकरे यांना जीवे ठार मारण्याची धमकीही दिली.

याप्रकरणी मुकेश भोकरे यांनी २८ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून लोहारा पोलीस ठाण्यात १. मच्छिंद्र शेषराव माने २. गोविंद मच्छिंद्र माने (दोघे रा. सेलू, ता. औसा, जि. लातूर) या दोन्ही आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११८(२), ३५२, ३५१(२), ३५१(३), ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास लोहारा पोलीस करत आहेत.

 





Previous Post

धाराशिव नगर परिषद निवडणूक: ऐन वेळी मतदान मशीनवरील ‘तुतारी’चा क्रमांक बदलला

Next Post

मोठा खुलासा! ढोकी शिवारातील ‘त्या’ जळीत महिलेची ओळख पटली; पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये निर्घृण हत्या

Next Post
मोठा खुलासा! ढोकी शिवारातील ‘त्या’ जळीत महिलेची ओळख पटली; पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये निर्घृण हत्या

मोठा खुलासा! ढोकी शिवारातील 'त्या' जळीत महिलेची ओळख पटली; पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये निर्घृण हत्या

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!