• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, March 3, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

मोठी बातमी: न्यायालयीन वाद असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर

असा आहे सुधारित निवडणूक कार्यक्रम

admin by admin
November 30, 2025
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?
0
SHARES
1.6k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

मुंबई/धाराशिव: राज्यातील ज्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांबाबत जिल्हा न्यायालयात अपील दाखल करण्यात आले होते, अशा ठिकाणच्या निवडणूक प्रक्रियेत राज्य निवडणूक आयोगाने मोठा बदल केला आहे. आयोगाने अशा बाधित जागांसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून, आता तेथे २० डिसेंबर २०२५ रोजी मतदान पार पडणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ४ नोव्हेंबर २०२५ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता.  निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारी अर्ज छाननीनंतर दिलेल्या निर्णयाविरोधात काही उमेदवारांनी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केले होते. नियमानुसार, या अपीलांचा निकाल २२ नोव्हेंबरपर्यंत लागणे अपेक्षित होते, जेणेकरून उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी तीन दिवसांचा वैधानिक कालावधी मिळू शकला असता.

मात्र, काही ठिकाणी न्यायालयाचे निकाल उशिराने (२३ नोव्हेंबर किंवा त्यानंतर) लागले. तरीही संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ न देताच २६ नोव्हेंबरला चिन्ह वाटप केले. ही प्रक्रिया नियमबाह्य ठरत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने अशा विशिष्ट जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित करून नव्याने वेळापत्रक जाहीर केले आहे.

असा आहे सुधारित निवडणूक कार्यक्रम:

हा सुधारित कार्यक्रम फक्त अशाच जागांसाठी किंवा अध्यक्षपदासाठी लागू असेल, जिथे अपील दाखल होते आणि त्याचा निकाल २३ नोव्हेंबर २०२५ किंवा त्यानंतर लागला आहे.

  • जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जारी करणे: ०४ डिसेंबर २०२५

  • उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: १० डिसेंबर २०२५ (दुपारी ३ वाजेपर्यंत)

  • निवडणूक चिन्ह वाटप व अंतिम उमेदवारांची यादी: ११ डिसेंबर २०२५

  • मतदानाचा दिनांक: २० डिसेंबर २०२५ (सकाळी ७.३० ते सायं. ५.३०)

  • मतमोजणी व निकाल: २१ डिसेंबर २०२५ (सकाळी १० वाजता)

  • आचारसंहिता लागू – जाहीर झालेल्या सुधारित कार्यक्रमानुसार संबंधित प्रभागासाठी (सदस्य पदासाठी) किंवा संपूर्ण शहरासाठी (अध्यक्ष पदासाठी) आचारसंहिता लागू झाली असून, ती निकाल जाहीर होईपर्यंत अंमलात राहील, असे राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी आदेशात स्पष्ट केले आहे.

Previous Post

धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!

Next Post

“धाराशिव फाइल्स : हातलादेवीतली ‘मिस्टर इंडिया’ कारंजी आणि ७५ लाखांची जादू!”

Next Post
“धाराशिव फाइल्स : हातलादेवीतली ‘मिस्टर इंडिया’ कारंजी आणि ७५ लाखांची जादू!”

"धाराशिव फाइल्स : हातलादेवीतली 'मिस्टर इंडिया' कारंजी आणि ७५ लाखांची जादू!"

ताज्या बातम्या

शासकीय योजना लाटण्यासाठी बनावट शिक्के आणि प्रमाणपत्रे

कळंब: पेट्रोल पंपाच्या भागीदारीत तब्बल साडेचार कोटींची फसवणूक; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

तुळजापूर: पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यानेच लांबवली ९० हजारांची रोकड; एकावर गुन्हा दाखल

March 3, 2026
आमदार राणाजगजितसिंह पाटील : मंत्रिपदाचं स्वप्न आणि ‘मित्र’ची भेट !

धाराशिव झेडपी सत्तापेच: तानाजी सावंतांना डावलण्याचा डाव उलटला, भाजप आमदार राणा पाटलांचे टेन्शन वाढले!

March 3, 2026
एसटीच्या ताफ्यात लवकरच “स्मार्ट बसेस”; प्रवासी सुरक्षेला प्राधान्य – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

“प्रसंगी विरोधात बसू, पण शिवसेनेत फूट पडू देणार नाही!” – पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा सज्जड इशारा

March 3, 2026
चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

चोराखळी : डोळ्यात चटणी फेकून आणि पिस्तूल-सुऱ्याचा धाक दाखवून कालिका कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा

March 3, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group