• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, October 24, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!

admin by admin
November 29, 2025
in धाराशिव शहर
Reading Time: 1 min read
धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: धाराशिव नगर परिषदेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच राजकीय वातावरणात आरोपांच्या तोफा धडाडू लागल्या आहेत. शहराच्या विकासाची नस असलेल्या तब्बल १४० कोटींच्या रस्त्यांच्या कामावरून आता पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यात जोरदार ‘कलगीतुरा’ रंगला आहे. “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार,” असे ओपन चॅलेंजच सरनाईकांनी दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नेमकं प्रकरण काय?

धाराशिव शहरातील ५९ प्रमुख रस्त्यांसाठी मंजूर झालेला १४० कोटींचा निधी आणि त्यातून होणारी कामे गेल्या १८ महिन्यांपासून रेंगाळली आहेत. रस्ते कामाच्या या ‘स्पीड ब्रेकर’वरून ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील यांनी सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले होते. “पालकमंत्री सरनाईक आणि भाजप आमदार राणा पाटील यांच्यातील अंतर्गत वादामुळेच शहराचा विकास खुंटला,” असा घणाघाती आरोप विरोधकांनी केला होता.

सरनाईकांचा ‘डॅशिंग’ अंदाज!

शिवसेना (शिंदे गट) पक्षाच्या २१ उमेदवारांच्या प्रचारसभेत बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आपल्या खास शैलीत उत्तर देताना ते म्हणाले, “निवडणुकीचा निकाल ३ डिसेंबरला आहे. तुम्ही फक्त आपल्या २१ शिलेदारांना निवडून द्या, या रखडलेल्या कामांचं नारळ मी स्वतः फोडणार! आणि ज्यांनी या कामाला विरोध केलाय, त्यांच्या ‘नाकावर टिचून’ ही कामं सुरू करणार!”

ओमराजेंची ‘गुगली’

सरनाईकांच्या या वक्तव्यावर खासदार ओमराजे निंबाळकर यांना छेडले असता, त्यांनी आपल्या मिश्किल शैलीत उत्तर दिले. ते म्हणाले, “ते कुणाच्या नाकावर टिचून काम सुरू करणार आहेत, हे एकदा त्यांनाच विचारा!” ओमराजेंच्या या उत्तराने सरनाईकांचा रोख नक्की विरोधकांकडे होता की स्वकीयांकडे (राणा पाटलांकडे)? अशी खुमासदार चर्चा आता धाराशिवच्या कट्ट्याकट्ट्यावर सुरू झाली आहे.

रस्त्यांच्या कामावरून पेटलेलं हे राजकारण ३ डिसेंबरनंतर विकासाचा मार्ग मोकळा करणार की, श्रेयावादाच्या लढाईत धाराशिवकर पुन्हा खड्ड्यातच राहणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

Previous Post

“शेतात असं काय लावलं की ७ कोटींची गाडी आली?” खासदार ओमराजेंचा आमदार राणा पाटलांना खोचक सवाल

Next Post

मोठी बातमी: न्यायालयीन वाद असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर

Next Post
धाराशिव ब्रेकिंग: नगरपरिषदेच्या ३ प्रभागांतील निवडणूक स्थगित; आयोगाच्या निर्णयाने मोठा गोंधळ, नगराध्यक्षपदाचा निकालही लांबणीवर?

मोठी बातमी: न्यायालयीन वाद असलेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसाठी सुधारित निवडणूक कार्यक्रम जाहीर

ताज्या बातम्या

धाराशिव शहरात पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीचा पर्दाफाश, ११ लाखांचा मुद्देमाल जप्त

भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला

October 23, 2026
वाशी शहरात ठाकरे गट आणि भाजप कार्यकर्त्यांत तुंबळ हाणामारी; चार जण गंभीर जखमी

धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण

October 23, 2026
धाराशिव साखर कारखाना अधिकाऱ्याची १.१० कोटी रुपयांची फसवणूक; चेअरमनच्या नावाने गंडा

धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा

October 23, 2026

Recent Posts

  • भूम : आयशर व पिकअपमधून जर्सी गायी अन् वासरांची अमानुष कोंबून वाहतूक; पांढरे देवी मंदिराजवळ भूम पोलिसांची कारवाई
  • धाराशिव : समतानगरातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण; अज्ञात व्यक्तीविरुद्ध आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
  • उमरगा : ‘आमच्या आक्काला पैसे द्यावे लागतात’ म्हणत सीएनजी पंपावर तरुणावर प्राणघातक हल्ला
  • धाराशिव : ६७ वर्षीय वृद्ध वडिलांना मुलगा अन् सुनेकडून लाथाबुक्क्यांनी, चपलेने बेदम मारहाण
  • धाराशिव : ‘गॅस पाईपलाईन अपडेट’च्या नावाखाली ६६ वर्षीय ज्येष्ठ महिलेला पावणेआठ लाखांचा गंडा
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!