• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Tuesday, July 21, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

“शेतात असं काय लावलं की ७ कोटींची गाडी आली?” खासदार ओमराजेंचा आमदार राणा पाटलांना खोचक सवाल

४५ वर्षांच्या सत्तेचा हिशोबही मांडला!

admin by admin
November 29, 2025
in राजकारण
Reading Time: 1 min read
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील
0
SHARES
588
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव: भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या ७ कोटी रुपयांच्या आलिशान ‘डिफेंडर’ गाडीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. या गाडीवरून झालेल्या टीकेला उत्तर देताना राणा पाटील यांनी आपण ‘तेर आणि १२ वाड्यांचे पाटील’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार ओमराजे निंबाळकर यांनी खरपूस समाचार घेत, पाटील घराण्याच्या संपत्तीवर आणि जिल्ह्याच्या विकासावर बोचरी टीका केली आहे.

काय म्हणाले ओमराजे निंबाळकर?

आमदार राणा पाटील यांच्या समर्थनावर बोलताना खासदार ओमराजे यांनी त्यांच्या घराण्याच्या इतिहासावर बोट ठेवले. ते म्हणाले, “राणा पाटील हे स्वतःला तेर आणि १२ वाड्यांचे पाटील म्हणवतात, पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की त्यांचे आजोबा हे तेरच्या पाटलांचे ‘दत्तक पुत्र’ होते. जिल्ह्यात असे अनेक पाटील आहेत ज्यांच्याकडे भरपूर शेती आहे, पण त्यांच्याकडे साधी गाडी देखील नाही. मग राणा पाटील यांनी आपल्या शेतात असे कोणते पीक लावले आहे, ज्यामुळे त्यांच्याकडे ७ कोटींची आलिशान गाडी आली?” असा खोचक सवाल त्यांनी उपस्थित केला.

श्रीमंत नेते, पण जिल्हा गरीब?

यावेळी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी जिल्ह्याच्या विकासाचा मुद्दा उपस्थित करत राणा पाटलांना कोंडीत पकडले. ते म्हणाले, “गेल्या ४५ वर्षांपासून या घराण्याकडे जिल्ह्याची सत्ता आहे. राणा पाटील यांचे वडील (डॉ. पद्मसिंह पाटील) खासदार असताना, देशातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीत त्यांचा तिसरा क्रमांक होता. मात्र, दुसरीकडे खेदाची बाब म्हणजे, ४५ वर्षे सत्ता उपभोगूनही धाराशिव जिल्हा आज ‘मागास जिल्ह्यांच्या’ (आकांक्षित जिल्हा) यादीत देशात तिसऱ्या क्रमांकावर आहे.”

नेते श्रीमंत होत गेले, पण जिल्हा मात्र मागासच राहिला, याला सर्वस्वी जबाबदार राणा पाटील आणि त्यांचे घराणे आहे, असा घणाघाती आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे.या टीकेमुळे आगामी काळात धाराशिवमधील राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता आहे.

Previous Post

मोठा खुलासा! ढोकी शिवारातील ‘त्या’ जळीत महिलेची ओळख पटली; पुण्यातून अपहरण करून धाराशिवमध्ये निर्घृण हत्या

Next Post

धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!

Next Post
धाराशिवच्या आखाड्यात ‘नारळ’ फोडण्यावरून जुंपली! “विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार”; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही ‘मिश्किल’ पलटवार!

धाराशिवच्या आखाड्यात 'नारळ' फोडण्यावरून जुंपली! "विरोधकांच्या नाकावर टिचून कामं करणार"; सरनाईकांचा एल्गार, तर ओमराजेंचाही 'मिश्किल' पलटवार!

ताज्या बातम्या

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

तुळजापूरात उभारला जाणार एसटी महामंडळाचा राज्यातील पहिला सौर ऊर्जा प्रकल्प

July 21, 2026
पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

पत्रकार जब्बार भाई यांच्या मातोश्री खैरुन्निसा शेख यांचे निधन

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

संपादकीय: सत्तेचा माज की गुंडगिरी? तुळजाभवानी मंदिरात अधिकाऱ्यांना शिवीगाळ खपवून घेतली जाणार नाही!

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

तुळजाभवानी मंदिर अधिकाऱ्यांना शिवीगाळ प्रकरण: कर्मचाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण

July 21, 2026
तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना अश्लील शिवीगाळ

July 21, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!