धाराशिव: म्हणतात ना, “आगीशिवाय धूर निघत नाही”, पण राजकारणात कधीकधी आग दुसरीकडेच असते आणि धूर भलतीकडेच सोडला जातो! काल दिवसभर धाराशिवमध्ये मल्लू नेरुळकर यांनी गणोजी शिर्के यांच्या कानात जी ‘कुजबूज’ केली, त्यावरून ब्रेकिंग न्यूजच्या पट्ट्या फिरल्या.
बातमी काय पेरली?
“अर्चना ताई या ‘त्यागमूर्ती’ आहेत. त्यांनी स्वतःहून माघार घेतली आहे. आता त्या सामान्य कार्यकर्त्याला संधी देणार आहेत.”
वाह! ऐकायला किती छान वाटतंय ना? पण थांबा… या ‘इमोशनल ड्रामा’चा पडदा आता फाटला आहे. हे ‘त्याग’ वगैरे सगळं थोतांड असून, सत्य परिस्थिती ही आहे की, भाजपनेच अर्चना पाटलांचा ‘पत्ता कट’ केला आहे!
💥 ‘त्याग’ नाही, हा तर ‘नाईलाज’!
जी बातमी मल्लू नेरुळकरांनी ‘ब्रेकिंग’ म्हणून पेरली, ती खरंतर ‘फेस सेव्हिंग’ (इभ्रत वाचवण्याची) धडपड होती. कारण अर्चना पाटील यांनी माघार घेतली नाही, तर पक्षाच्या ‘नवी दिल्ली’ स्टाईल धोरणामुळे त्यांना उमेदवारी नाकारली गेली आहे.
🚫 बसवराज पाटलांनी फोडलेला ‘बॉम्ब’
भाजपचे ज्येष्ठ नेते बसवराज पाटील मुरूमकर यांनी या सस्पेन्सवरून पडदा हटवला आहे. त्यांनी स्पष्ट केलेल्या भाजपच्या नव्या ‘हायकमांड’ धोरणानुसार:
“ज्या घरात ऑलरेडी आमदार किंवा खासदार आहेत, त्या घरातील इतर कोणत्याही सदस्याला जिल्हा परिषदेचे तिकीट मिळणार नाही!”
या एकाच नियमाने आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांच्या ‘होम पीच’वर क्लीन बोल्ड केला आहे. राणा पाटील आमदार असल्यामुळे, त्यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी देणे पक्षाच्या तत्त्वात बसत नव्हते.
🤫 सत्य लपवण्यासाठी ‘त्यागा’चा मुलामा?
थोडक्यात काय, तर पक्षाने तिकीट कापले हे सांगायला कमीपणा वाटतो, म्हणून “आम्हीच मोठ्या मनाने माघार घेतली आणि सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली,” अशी ही सोयीस्कर स्क्रिप्ट लिहून मल्लू नेरुळकरांमार्फत ती मार्केटमध्ये सोडण्यात आली.
जिल्हा परिषद अध्यक्षपद (महिला ओपन) खुणावत असताना कुणी सहजासहजी मैदान सोडत नाही. हा ‘त्याग’ नसून, हा भाजपच्या ‘अँटी-घराणेशाही’ धोरणाचा ‘करेक्ट कार्यक्रम’ आहे. आता अर्चना ताई गेल्या, पण ‘तो’ सामान्य कार्यकर्ता कोण असणार? हे पाहणे रंजक ठरेल!





