• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Saturday, July 11, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

चोराखळीतील कला केंद्रात नृत्य पाहून परतताना केजच्या तरुणाचा खून; ५ मित्रांना पोलीस कोठडी

admin by admin
February 16, 2026
in क्राईम
Reading Time: 1 min read
चोराखळीतील कला केंद्रात नृत्य पाहून परतताना केजच्या तरुणाचा खून; ५ मित्रांना पोलीस कोठडी
0
SHARES
2.3k
VIEWS
बातमी शेअर कराShare ItShare It

कळंब: तालुक्यातील चोराखळी येथील महाकाली कला केंद्रात नृत्याचा कार्यक्रम पाहून परतत असताना, मागील भांडणाच्या रागातून केज तालुक्यातील एका तरुणाचा त्याच्याच मित्रांनी निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी (दि. १२) ही घटना घडली असून, याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने संशयित आरोपींना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सतीश भागवत मुंडे (वय ३७, रा. साळेगाव, ता. केज, जि. बीड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सतीशचे वडील भागवत मुंडे यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

नेमकी घटना काय?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश मुंडे आणि त्याचे सहकारी मित्र गुरुवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चोराखळी येथील महाकाली कलाकेंद्रात नृत्य पाहण्यासाठी गेले होते. मध्यरात्री एक वाजेपर्यंत ते तिथेच होते. मात्र, परतत असताना मागील भांडणाच्या कारणावरून सोबत असलेल्या पाच जणांनी सतीशचा खून केला.

धक्कादायक बाब म्हणजे, खून केल्यानंतर आरोपींनी सतीशचा मृतदेह घरी आणला. “त्याला खूप झोप लागली आहे, तो उठतच नाही,” असे त्याच्या घरच्यांना सांगून त्यांनी तिथून पळ काढला. संशय आल्याने वडिलांनी सतीशला तातडीने रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्याला तपासाअंती मृत घोषित केले.

पाच जणांवर गुन्हा दाखल

मयत सतीशच्या वडिलांच्या फिर्यादीवरून शेख मुन्ना शेख जिलानी, शेख रौफ, संजय गीते, मधुकर इंगळे आणि दत्ता तोंडे (सर्व रा. साळेगाव, ता. केज) या पाच जणांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक करून न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना बुधवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

सीसीटीव्हीत संशयास्पद हालचाली

कला केंद्रातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, सतीश आणि त्याचे सहकारी तिथे असताना काहीतरी गडबड सुरू असल्याचे दिसून आले आहे. भांडण नेमके कोणासोबत झाले हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी, कला केंद्रांच्या परिसरात होणारी भांडणे आणि गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरली आहे.

Previous Post

धाराशिव जिल्हा परिषद: सत्तेच्या सारीपाटावर ‘महायुती’तच महायुद्ध…

Next Post

परंडा : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वांगी फाटा येथील थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

Next Post
वाशी : लाखनगावात सव्वा लाखाचा गांजा जप्त, आरोपी फरार

परंडा : आर्थिक वादातून तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण; वांगी फाटा येथील थरार, ७ जणांवर गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

भूम शहरात तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला!

July 11, 2026
ओळख लपवून तरुणीवर तीन वर्षे वारंवार लैंगिक अत्याचार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देऊन सक्तीने विवाह

परंड्यात ‘उपोषणाचा अर्ज’ दिल्याच्या रागातून घरावार जीवघेणा हल्ला!

July 11, 2026
कळंब – मोबाईलवर गेम खेळू न दिल्याच्या क्षुल्लक कारणावरून १६ वर्षांच्या मुलीची आत्महत्या

कळंब तालुक्यात सावकारी त्रासाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या! हावरगाव शिवारात लिंबाच्या झाडाला घेतला गळफास; कोल्हे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल

July 11, 2026
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

July 10, 2026
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

July 10, 2026
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!
WhatsApp us
WhatsApp Group