• Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy
Monday, August 10, 2026
Dharashivlive
Advertisement
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी
No Result
View All Result
Dharashivlive
No Result
View All Result

‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’

 चिनी कंपनीच्या सीसीटीव्ही प्रकरणी आमदार कैलास पाटील यांची एसआयटी चौकशीची मागणी

admin by admin
July 10, 2026
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
‘हिंदुत्ववादी सरकारनेच आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?’
0
SHARES
बातमी शेअर कराShare ItShare It

धाराशिव |  तुळजापूर शहर आणि श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात चिनी कंपनीचे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आल्याचा गंभीर आरोप करत, “हिंदुत्ववादी सरकारनेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या सुरक्षेशी तडजोड केली का?” असा थेट सवाल ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांनी विधानसभेत उपस्थित केला. या संपूर्ण प्रकरणाची विशेष तपास पथक (एसआयटी) मार्फत चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी पावसाळी अधिवेशनातील अंतिम आठवडा प्रस्तावावर केली.

आमदार पाटील यांनी सांगितले की, केंद्र सरकारने ७ मार्च २०२४ रोजीच्या राजपत्राद्वारे सुरक्षेच्या कारणास्तव काही चिनी कंपन्यांच्या सीसीटीव्ही प्रणालींवर निर्बंध घातले असून, STQC (स्टँडर्डायझेशन टेस्टिंग अँड क्वालिटी सर्टिफिकेशन) मान्यताप्राप्त कंपन्यांचेच कॅमेरे बसविण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, तुळजापूर शहरात तब्बल ६७ ठिकाणी युनिव्हियू (Uniview) कंपनीचे सीसीटीव्ही बसविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.

“छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत आणि महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या आई तुळजाभवानीच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड स्वीकारली जाऊ शकत नाही. गृह विभागाच्या अखत्यारीत हे काम होत असताना केंद्र सरकारच्या निर्देशांचे पालन का झाले नाही, याचे उत्तर सरकारने द्यावे,” अशी मागणीही त्यांनी केली.

इतिहासाचा संदर्भ देताना पाटील म्हणाले की, १६५९ मध्ये अफजलखानाच्या स्वारीवेळी स्थानिक पुजारी आणि तुळजापूरकरांनी आई तुळजाभवानीच्या मूर्तीचे संरक्षण केले होते. मात्र, आज हिंदुत्ववादी सरकारच्या काळातच मंदिराच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे, असा आरोप त्यांनी केला.

अयोध्येतील राम मंदिरातील चोरीच्या घटनेचाही उल्लेख करत, हिंदूंच्या प्रमुख श्रद्धास्थानांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याचे त्यांनी नमूद केले. “मतदारांनी हिंदुत्ववादी सरकार म्हणून निवडून दिलेल्या सरकारच्या काळातच अशा घटना घडत असतील, तर हेच हिंदुत्व आहे का?” असा सवाल त्यांनी सभागृहात उपस्थित केला.

चिनी कंपनीच्या सर्व्हरद्वारे संवेदनशील माहिती परदेशात जाण्याचा धोका असल्याचा दावा करत, या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत सखोल चौकशी करून जबाबदार अधिकारी, संबंधित यंत्रणा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आमदार कैलास पाटील यांनी सरकारकडे केली.

 

Previous Post

रेल्वेचा पाठपुरावा सूर्यराजेंचा, अन् ट्रॅकवर ‘सेल्फी’ फेसबुक पिंट्याचा! ‘बोरूबहाद्दरां’चे साहेबांना खुले आव्हान!

Next Post

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

Next Post
धाराशिव पीक विमा: उच्च न्यायालयाच्या निकालाने शेतकऱ्यांना धक्का, कंपनीला दिलासा

हरवलेल्या विवाहित महिलेला शोधून न्यायालयात हजर करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

ताज्या बातम्या

धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

२४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!

August 10, 2026
धाराशिव जिल्ह्यात शिक्षक भरतीत ३०० बोगस नियुक्त्या!

१.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!

August 10, 2026
धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा : कोणते अधिकारी निलंबित?

धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’

August 10, 2026
तरुणांना रोजगाराच्या अनगिनत संधी उपलब्ध करून देणारा अंतरिम अर्थसंकल्प – आ.राणाजगजितसिंह पाटील

३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या

August 9, 2026
तुळजापुरात दर्शनाला जाणाऱ्या महिलेला लुटले; ८१ हजारांचे दागिने लंपास

कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास

August 9, 2026

Recent Posts

  • २४० कोटींचा नवा ‘महाल’, १४ कोटींचे थकीत भाडे आणि मोक्याच्या जागेवर बांधा-वापरा-हडपा (BOT) चा डाव!
  • १.१५ कोटींचा कोरोना निधी: ११ बैठका, शून्य निर्णय आणि गुरुजींचा संताप!
  • धाराशिव कृषी निविष्ठा घोटाळा: १४ अधिकाऱ्यांचे निलंबन, मात्र २९ शेतकरी उत्पादक आणि २ निर्मिती कंपन्यांना ‘राजाश्रय’
  • ३६ महसूल मंडळांतील शेतकऱ्यांना पीक विमा भरपाई द्या
  • कळंब बसस्थानकात महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठन लंपास
Dharashivlive

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

Navigate Site

  • Home
  • Contact Us
  • About Us
  • Privacy Policy

Follow Us

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • ताज्या बातम्या
  • विशेष बातम्या
  • धाराशिव शहर
  • धाराशिव जिल्हा
  • मराठवाड़ा
  • महाराष्ट्र
  • देश -विदेश
  • अन्य
    • झलक
    • ब्लॉग
    • मुक्तरंग
    • सडेतोड
    • ऐकावे ते नवल
    • करमणूक
    • क्राईम
    • क्रीडा
    • गोफणगुंडा
    • राजकारण
    • ई पेपर
    • शेती – शेतकरी

© 2023 Dharashiv Live - Design By Codenetz .

error: Content is protected !!